अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत खाजगी विमानाने दुबईला रवाना

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 16 September 2020

अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत दुबईला रवाना झाला आहे. दोघेही खाजगी विमानाने दुबईसाठी निघाले आहेत.मान्यता दत्तने संजयसोबतचा विमानातील फोटो शेअर करत लिहिलंय, 'एनरुट लाईफ.'

मुंबई- अभिनेता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत दुबईला रवाना झाला आहे. दोघेही खाजगी विमानाने दुबईसाठी निघाले आहेत. या प्रवासादरम्यानचे त्यांचे काही फोटो मान्यता दत्तने तिच्या इंस्टग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या सेल्फीमध्ये संजय दत्तचा नवा लूक दिसून येतोय.

हे ही वाचा: सलमान खानसोबत सिद्धार्थ शुक्ला करणार 'बिग बॉस १४' होस्ट?  

मान्यता दत्तने संजयसोबतचा विमानातील फोटो शेअर करत लिहिलंय, 'एनरुट लाईफ.' इंडस्ट्रीमधील सुत्रांच्या माहितीनुसार, संजय दत्त त्याच्या मुलांना भेटण्यासाठी दुबईला गेला आहे. तो एक आठवडा ते १० दिवस दुबईत असणार आहे. संजयची दोन्ही मुलं दुबईत आहे आणि तिथेच त्यांचं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. संजय दत्त त्याच्या मुलांना भेटून काही दिवसांनी पुन्हा मुंबईत परतणार आहे. 

अभिनेता संजय दत्तला कॅन्सरचं निदान झालं तेव्हा मान्यता मुलांसोबत दुबईत होती. ती नंतर संजयला भेटण्यासाठी मुंबईत आली. मान्यता अनेकदा संजयच्या आरोग्या बद्दलचे अपडेट्स सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. या दोघांचा विमानातील हा फोटो पाहून अनेकांनी संजय आणि मान्यता दुबईला कॅन्सरवर उपचारासाठी जात असल्याचं देखील म्हटलं होतं. या फोटोमध्ये संजय दत्त क्लीन शेवमध्ये दिसत आहे. तसंच दोघांच्या चेह-यावर सकारात्मकता दिसून येत आहे. 

याआधी संजय दत्तचा व्हिडिओ सोशल मिडियावर दिसला होता ज्यात तो फोटोग्राफर्सना मास्क वापरायला सांगत होता. संजय आणि मान्यताने फोटोग्राफर्सना हात दाखवल्यानंतर फोटोग्राफर्सनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. संजय त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला हो 'मी ठिक आहे' तेव्हा फोटोग्राफर्स म्हणाले 'आमच्या सगळ्यांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत.'  

संजय दत्तचा चर्चेत असलेला व्हिडिओ-

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#SanjayDutt #MaanayataDutt snapped at their house in Mumbai today #Instadaily #tuesday #manavmanglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay dutt jetted off to dubai maanayata shared a lovely selfie on instagram