'भूमी'च्या पोस्टरने संजूबाबाचा वाढदिवस साजरा

टीम ई सकाळ
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई : मेरी कोम फेम उमंग कुमारच्या आगामी चित्रपटात संजय दत्तची भूमिका आहे. तुरुंगवास भोगून परत आल्यानंतर संजूबाबाने हा चित्रपट स्विकारला. आता तो प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज लाॅंच करण्यात आले. विशेष बाब अशी की संजय दत्तचा आज वाढदिवस आहे. या दिवशीच संजयने पोस्टर लाॅंच करून चाहत्यांना आगळी भेट दिली आहे.

उमंग कुमारच्या या चित्रपटात संजय दत्तसह शेखर सुमन यांचीही एक भूमिका आहे. या पोस्टरमधून चित्रपटाचा अंदाज येत नाही. पण, संजय दत्त अत्यंत रक्ताळलेल्या अवस्थेत दिसतो. या पोस्टरमधून हा चित्रपट आक्रमक असणार असे दिसते. या पोस्टरवर आॅनलाइन जगताच्या उड्या पडल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी संजय दत्तचा नवा सिनेमा येणार असल्याने या सिनेमाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. 

Web Title: sanjay dutt new movie bhoomi poster esakal news