संजय दत्तचा हॉस्पिटलमधून व्हायरल झाला 'हा' फोटो, संजूबाबाला अशा अवतारात पाहून चाहत्यांना बसला धक्का

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 5 October 2020

मुंबईतील हॉस्पिटलमधील संजय दत्तचा एक फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो खूपंच अशक्त दिसतोय. त्याचा हा अवतार पाहुन चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

मुंबई- अभिनेता संजय दत्तला कॅन्सरचं निदान झालं आहे. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये सध्या तो कॅन्सरवर उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वीच संजय दत्त पत्नी मान्यतासोबत दुबईला गेला होता. तिथे काही दिवस मुलांसोबत घालवल्यानंतर तो नुकताच मुंबईत उपचारांसाठी परतला आहे. मुंबईतील हॉस्पिटलमधील संजय दत्तचा एक फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो खूपंच अशक्त दिसतोय. त्याचा हा अवतार पाहुन चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

हे ही वाचा: अमिताभ बच्चन यांच्यावर मित्राने केला दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, बिग बींनी दिलं मजेशीर उत्तर

अभिनेता संजय दत्त १० दिवसांसाठी चार्टर्ड विमानाने दुबईला गेला होता. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर तो पहिल्यांदा त्याच्या मुलांना भेटला. संजय दत्तचा हा व्हायरल होत असलेला फोटो पाहुन चाहते हैराण झाले आहेत. एका युजरने संजय दत्तच्या फोटोवर कमेंट करत म्हटलं आहे, 'एक कलाकार म्हणून मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. मात्र एक माणुस म्हणून मी देवाकडे प्रार्थना करेन देव तुम्हाला ताकद देओ. नेहमी चांगलंच होईल या शुभेच्छा.'

संजय दत्त

दुस-या एका युजरने म्हटलंय, 'संजूबाबा खूप अशक्त दिसत आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.' तर आणखी एकाने लिहिलंय, 'आशा करतो की तुम्ही लवकर बरे व्हाल.' सोशल मिडियावर प्रत्येकजण आपला आवडता अभिनेता लवकर बरा व्हाला यासाठी प्रार्थना करत आहेत. 

संजय दत्त त्याची तिसरी केमोथेरपी करण्यासाठी दुबईहून मुंबईला पोहोचला आहे. संजय दत्त सध्या फुफ्फुसाच्या कॅन्सरने ग्रस्त आहे. त्याच्यावर कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ११ ऑगस्टला त्याला कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर आलं होतं.   

संजय दत्त परिवार के साथ

sanjay dutt pic goes viral who is getting treated after being diagnosed with cancer  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay dutt pic goes viral who is getting treated after being diagnosed with cancer