esakal | कॅन्सरबरोबरची लढाई संजूबाबाने जिंकली
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay dutt recover from cancer

गेल्या काही दिवसांपूर्वी  त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तिने “कॅन्सरचा मी पराभव करेन” असं म्हटलं होतं.  हेअरस्टायलिस्ट अलिम हकिमने त्याच्या इन्स्टाग्रामवर तो व्हिडीओ पोस्ट केला होता. परदेशात उपचार घेतल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.

कॅन्सरबरोबरची लढाई संजूबाबाने जिंकली

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये त्यावेळी एक निराशा पसरली होती. ज्यावेळी अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सरचं निदान झाल्याची बातमी प्रसिध्द झाली. त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. आपला आवडता अभिनेत्याया कॅन्सरची झालेला आजार लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना सुरु केली. अखेर स्वत; संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन आपण त्या जीवघेण्या आजारातून बाहेर आल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी  त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तिने “कॅन्सरचा मी पराभव करेन” असं म्हटलं होतं.  हेअरस्टायलिस्ट अलिम हकिमने त्याच्या इन्स्टाग्रामवर तो व्हिडीओ पोस्ट केला होता. परदेशात उपचार घेतल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आता बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने ट्विट करत कॅन्सरमुक्त झाल्याची माहिती आपल्या मुलांचा १०वा वाढदिवस साजरा करताना दिली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.यासगळ्यात त्याच्या पाठीशी असणा-या त्याच्या चाहत्यांचे बाबाने आभार मानले आहेत. ‘तुमच्या सर्वांच्या विश्वास आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते’ असे त्याने म्हटले आहे. संजय दत्तवर कोकिलाबेन रूग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांची टीम, तेथील स्टाफ आणि नर्स या सर्वांचा उल्लेख करत आभार मानले आहेत.

त्या पोस्टमध्ये संजय दत्त म्हणतो, “मागील काही आठवडे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण काळ होता.  असे म्हटले जाते की, देव सर्वात ताकदवान अशा सैनिकालाच सर्वात कठीण लढाई देतो आणि आज, माझ्या मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच, मी या लढाईवर विजय मिळवला आहे. मला फार आनंद झाला आहे.येत्या काळात संजय दत्त ‘केजीएफ: चाप्टर २’मध्ये अधीराची भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचंही त्याने या व्हिडीओत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला फुफ्फुसाच्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. 

 
 

loading image