संजू बाबाची न्यु हेअर स्टाईल 'बोले तो सबसे हटके' 

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 30 October 2020

बाबाने त्याच्या पाठीशी असणा-या त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘तुमच्या सर्वांचा विश्वास आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते’ असे त्याने म्हटले आहे.

मुंबई -बॉलीवूड अभिनेता संजय दत्त कॅन्सर सारख्या आजारातून बाहेर आल्याची सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय संजय दत्तनेही त्याच्या इंस्टाच्या अकाउंटवरुन आपण कॅन्सरसोबतची लढाई जिंकल्याची पोस्ट शेयर केली. लाखो चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. आता संजूबाबाने आपल्या एका नव्या हेअर स्टाईलचा लूक शेयर केला आहे. त्याचा हा नवा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

बाबाने त्याच्या पाठीशी असणा-या त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘तुमच्या सर्वांचा विश्वास आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते’ असे त्याने म्हटले आहे. संजय दत्तवर कोकिलाबेन रूग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांची टीम, तेथील स्टाफ आणि नर्स या सर्वांचा उल्लेख करत आभार मानले आहेत. त्या पोस्टमध्ये संजय दत्त म्हणतो, “मागील काही आठवडे माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी खूप कठीण काळ होता.  असे म्हटले जाते की, देव सर्वात ताकदवान अशा सैनिकालाच सर्वात कठीण लढाई देतो.

IN PICS: Sanjay Dutt Flaunts Platinum Blonde Hairdo As He Opted For A New Look To Celebrate His Recovery From Cancer!

आता आपण पूर्णपणे बरे झाले असून कुठलीही काळजी करण्याची गरज नसल्याचे बाबाने म्हटले आहे. कॅन्सर बरोबरची लढाई जिंकल्यानंतर बाबाने हेअर स्टाईलचा नवीन लुक केला आहे. त्याचे फोटो व्हायरल केले असून त्याला चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. संजय दत्तचा हेअर स्टाईललिस्ट आलिम हकीमने हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात बाबाचा एकदम कूल लुक समोर आला आहे. या नवीन लुकचे काय नाव आहे यावर त्याने त्याला प्लेटिनम ब्लोंड लुक असे म्हटले आहे. त्यात बाबाची दाढी पांढरी दिसत असून त्यानं निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळा चश्मा लावला आहे.

IN PICS: Sanjay Dutt Flaunts Platinum Blonde Hairdo As He Opted For A New Look To Celebrate His Recovery From Cancer!

 गेल्या काही दिवसांपूर्वीचा  त्याचा एक व्हिडीओ अलिम हकिमनेच त्याच्या इन्स्टाग्रामवर तो व्हिडीओ पोस्ट केला होता. परदेशात उपचार घेतल्यानंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. आता बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने ट्विट करत कॅन्सरमुक्त झाल्याची माहिती आपल्या मुलांचा १०वा वाढदिवस साजरा करताना दिली होती. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.

IN PICS: Sanjay Dutt Flaunts Platinum Blonde Hairdo As He Opted For A New Look To Celebrate His Recovery From Cancer!

येत्या काळात संजय दत्त ‘केजीएफ: चाप्टर २’मध्ये अधीराची भूमिका साकारताना दिसणार आहे. लवकरच शूटिंगला सुरुवात करणार असल्याचंही त्याने या व्हिडीओत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला फुफ्फुसाच्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My heart is filled with gratitude as I share this news with all of you today. Thank you

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Dutt share flaunts hair style latest photos