संजु बाबानं सुरु केलं प्रॉडक्शन हाऊस, नाव काय आहे माहितीये?

Sanjay Dutt
Sanjay Dutt

अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) सोमवारी त्याचे प्रोडक्शन हाऊस सुरू केल्याचे सांगितले. त्याच्या प्रोडक्शन हाऊस थ्री डायमेंशन मोशन पिक्चर्सद्वारे (Three Dimension Motion Pictures), संजयने इंडस्ट्रीमध्ये वीरतेचा सुवर्णकाळ परत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितले की, पुष्पा (Pushpa) आणि बाहुबली (Bhaubhali) सारख्या चित्रपटांचे यश हे "बॉलिवुडमधील लार्जर-दॅन-लाइफ हिरोइझम" (Bollywood's larger than life Heroism) ची उदाहरणे आहेत. "जेव्हा आम्ही चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा आम्ही वीरता, वीरतापूर्ण भूमिका, सामूहिक प्रेम आणि सर्व गोष्टींनी सुरुवात केली, जे आता हळुहळु कमी होतं चाललं आहे. मी ते पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहे," तो म्हणाला.

संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसची सुरुवात 'द व्हर्जिन ट्री' (The Virgin Tree) नावाच्या हॉरर कॉमेडीने होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेव (Siddhant Sachdev) करणार असून यात चार नवोदित कलाकार काम करणार आहेत. त्यांनी अद्याप पुढच्या चित्रपटांबद्दल काही माहिती दिली नाहीये.

संजय दत्तने देखील आपण निर्मित केलेल्या काही चित्रपटांमध्ये काम करणार असल्याचा खुलासा केला आहे. “इंडस्ट्रीमध्ये 40 वर्षे राहिल्यानंतर आता मला निर्माता म्हणून काम करायला आवडेल, सेटच्या दुसऱ्या बाजूला राहायला आवडेल. हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव असेल. मी यापूर्वी कधीही त्या खुर्चीवर बसलो नाही. त्यामुळे, मी त्याची वाट पाहत आहे,” दत्त म्हणाला.

Sanjay Dutt
Akshay Kumar: 'मी बॉलीवूडमध्ये आलो तेव्हा तुझा जन्म झाला टायगर'

थ्री डायमेन्शन निर्मित सर्व चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित केले जातील कारण डिजिटल प्लॅटफॉर्मच्या (OTT) युगातही मोठ्या पडद्याची क्रेझ कधीच संपणार नाही असा विश्वास संजयला आहे. “मला माहित आहे की OTT हा आज चित्रपट निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण मला माहित आहे की शेवटी थिएटर्स उघडतील आणि काही चित्रपट फक्त थिएटर्ससाठी बनवले जातील," त्याने सांगितले.

दरम्यान, संजय दत्तचे अनेक चित्रपट येणार आहेत ज्यात तो अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) पृथ्वीराज (Prithivraj), रणबीर कपूरसोबत (Ranbeer Kapoor) शमशेरा (Shamshera) आणि KGF: Chapter 2, 2018 च्या कन्नड चित्रपटाचा सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com