"जग्गा जासूस'मध्ये संजय दत्त 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

अभिनेता रणबीर कपूरचा बऱ्याच कालावधीपासून रखडलेला "जग्गा जासूस' चित्रपट अखेर प्रदर्शित होणार आहे. त्यात आता म्हणे संजय दत्तचाही समावेश करून घेण्यात आलाय; पण या सिनेमात संजय दत्त अभिनय करताना दिसणार नाही, तर तो नॅरेटर (कथन करणारा) आहे.

"जग्गा जासूस' हा चित्रपट संगीतप्रधान असून, यात रणबीर अडखळत बोलताना दिसणार आहे. चित्रपटात त्याचे जास्त संवाद प्रेयसीसोबत आहेत तेही गाण्याच्या रूपात. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना वाटलं की या चित्रपटासाठी नॅरेटरची आवश्‍यकता आहे आणि त्यासाठी संजय दत्तची निवड करण्यात आली. संजय दत्तचं नाव रणबीरनेच सुचविले.

जेव्हा संजय दत्तला याबाबत सांगितले त्या वेळी त्याला ही कल्पना खूपच भावली आणि त्याने चित्रपट कथन करण्यास होकार दिला. पुढील आठवड्यात संजय दत्त या चित्रपटाचं डबिंग पूर्ण करणार आहे. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच नॅरेटरची गरज का पडली असेल, याचा खुलासा होईल. 

Web Title: sanjay dutta in jagga jasus