आदिती गातेय संजय लीला भन्साळींचे गोडवे

सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

आदिती राव हैदरीने अल्पावधीत आपली ओळख कमावली आहे. आता संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीमध्ये तिची छोटी भूमिक आहे. या चित्रपटाने पहिल्यांदाच तिने भन्साळी यांच्यासोबत काम केलं. एकूण भन्साळी यांचा अॅप्रोच, त्याच्या कामाची पद्धत यामुळे आदिती भलतीच खुश आहे. 

मुंबई : आदिती राव हैदरीने अल्पावधीत आपली ओळख कमावली आहे. आता संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावतीमध्ये तिची छोटी भूमिक आहे. या चित्रपटाने पहिल्यांदाच तिने भन्साळी यांच्यासोबत काम केलं. एकूण भन्साळी यांचा अॅप्रोच, त्याच्या कामाची पद्धत यामुळे आदिती भलतीच खुश आहे. 

भन्साळी यांच्याबद्दल बोलताना आदिती म्हणाली, त्यांच्यासोबत काम करण्याची माझी ही पहिलीच वेळ. पण त्यांच्या मनात भूमिकेचा पक्का ग्राफ असतो. आपल्या चित्रपटात असलेल्या प्रत्येक महिला व्यक्तिरेखांबाबत ते सजग असतात. गोलीयों की रासलीला रामलीला या चित्रपटात दीपिका रणवीर यांची कामं तर चांगली झाली आहेतच. पण रिचा चढ्ढाही अत्यंत छोड्या भूमिकेत होती. पण तिची भूमिका लोकांच्या लक्षात राहीली. पद्मावती या चित्रपटात माझीही छोटी भूमिका आहे. पण ती लोकांच्या लक्षात राहील अशी खात्री वाटते मला. ज्यांनी ज्यांनी भन्साळी प्राॅडक्शनसोबत काम केलं आहे, त्यांना या बॅनरचा उपयोग झाला आहे'.'

 

Web Title: sanjay leela bhansali padmavati aditi rao hydari esakal news