मराठी सिनेसृष्टीत शिरलेली ती 'शबाना' कोण?

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

सध्या मराठी सिनेजगतात एक शबाना शिरली आहे, शोधा.. हुडका.. असे थेट आव्हान केले आहे, मराठी सिने, नाट्य आणि मालिका जगतातील ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी. बुधवारी भल्या सकाळी फेसबुकवर अशी पोस्ट टाकून मोने यांनी धमाल उडवून दिली आहे. त्यावरच्या कमेंटसनीही गमतीदार खसखस पिकवली आहे. 

मुंबई : सध्या मराठी सिनेजगतात एक शबाना शिरली आहे, शोधा.. हुडका.. असे थेट आव्हान केले आहे, मराठी सिने, नाट्य आणि मालिका जगतातील ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी. बुधवारी भल्या सकाळी फेसबुकवर अशी पोस्ट टाकून मोने यांनी धमाल उडवून दिली आहे. त्यावरच्या कमेंटसनीही गमतीदार खसखस पिकवली आहे. 

या पोस्टवर अभिनेते प्रदीप वेलणकर, डाॅ. गिरीश ओक, लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे आदी अनेक लोक व्यक्त झाले आहेत. अनेकांनी मोने यांनाच हे नाव घोषित करण्याची गळ घातली आहे. तर काहींनी मराठी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींची नावेही घेतली आहेत. अनेकांनी हार मानल्यावर त्यावरही अस्सल मोने स्टाईलने त्यांनी कमेंट केली आहे. ते म्हणतात, 'साक्षात आपण हरलात?ज्ञानाची पाणपोई हतबल?मग सामन्यांनी ज्ञानतोय मिळवावे तरी कुठून?नावं मनाशी ताडून बघा आणि घोषित करा.कदाचित प्रत्येकाची शबाना भिन्न असेल.' यावर डाॅ. गिरीश ओक यांनीही कोपरखळी मारत 'प्रत्येकाचा वेगळी कशी. तुम्ही एकदा ठरवलीत की आमचीही तीच ती.'' असे सांगत एकच हशा पिकवला आहे. 

तर लेखक, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी साडेतीन शहाणे असा मार्मिक टोला हाणला आहे. मोने यांच्या या पोस्टने मराठी सिनेसृष्टीत नेमकी कोण 'शबाना' शिरली आहे, याकडे लक्ष वेधले आहे. आता यावर  मोने काय प्रतिक्रीया देतात ते पाहायला हवे. 

Web Title: sanjay mone FB post esakal news