संजूला या वर्षातली सर्वात मोठी ओपनिंग

शनिवार, 30 जून 2018

बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी 32 कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. या वर्षातला हा सर्वात जास्त ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने रेस 3, पद्मावत, बागी 2 यां चित्रपटांना मागे टाकत यांच्यापेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला या वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जोरदार कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी 32 कोटी रुपयांचा गल्ला चित्रपटाने जमवला आहे. या वर्षातला हा सर्वात जास्त ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने रेस 3, पद्मावत, बागी 2 यां चित्रपटांना मागे टाकत यांच्यापेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

रेस 3 ने पहिल्या दिवशी 29.17 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर बागी 2 ने 25.10 कोटी रुपये आणि पद्मावतने 19 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. आता यादीत संजू सर्वात वर आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'संजू' चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने साकारली असून, संजय दत्तच्या आयुष्यात नेमके काय घडले याची सत्यकथा या चित्रपटातून उतरवण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केला. या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित माहिती देण्यात आली आहे. संजय दत्त जसा होता, अगदी तशीच बाजू या चित्रपटात दाखवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.  

या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेता परेश रावल, अनुष्का शर्मा, विकी कौशल, दिया मिर्झा, सोनम कपूर, करिश्मा तन्ना आणि मनिषा कोईराला यांच्या भुमिका आहेत.

Web Title: Sanju Box Office Collection Day 1