'सारखं काहीतरी होतंय...'संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील 'समीर' ही संकर्षण कऱ्हाडेनं साकारलेल्या व्यक्तिरेखेला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलंय.
Sankarshan Karhade
Sankarshan KarhadeInstagram

'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेतील समीर हा आता यश,नेहा,परी या व्यक्तिरेखांइतकाच मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलाय. गेली अनेक वर्ष मराठी नाट्यसृष्टी,सिनेमा अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर वावरताना आपल्या हरहुन्नरी अभिनयानं संकर्षणनं प्रेक्षकांना कधीच आपलंस केलं होतं. पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असलेली त्याची ओळख व्यापक बनत गेली ती 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील समीर या भूमिकेनंतर. संकर्षण बदद्ल मध्यंतरी एक अफवा जोरदार होती की तो करीत असलेला नवीन चर्चेतला कार्यक्रम 'किचन कल्लाकार' याचं सूत्रसंचालन तो आता करणार नाही,त्याची जागा श्रेया बुगडेनं पटकावली वगैरे वगैरे. पण या अशा अफवांना भीक न घालता संकर्षणने आपलं काम चोख सुरु ठेवत जे आपलं आहे ते आपल्याकडचं ठेवून घेतलं.

संकर्षण सोशल मीडियावर तसा फार सक्रिय नसला तरी आपल्या नवीन कामाविषयी किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टीविषयीच्या पोस्ट तो शेअर करताना दिसतो. आता सध्या त्याची एक पोस्ट चर्चेत आलीय. त्या पोस्टला त्यानं कॅप्शन दिलंय ''सारखं काहीतरी होतंय...''. त्यानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. सोबत एक व्हिडीओसुद्धा शेअर केलाय. काय आहे बरं हे सगळं. तर हा व्हिडीओ आहे संकर्षणच्या नव्या नाटकाच्या टीझरचा. ज्यात आपण पाहू शकतोय प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर या दिग्गज कलाकारांना.

Sankarshan Karhade
मुलीच्या जन्मानंतर आदित्य नारायणनं घेतला मोठा निर्णय;चाहते नाराज

संकर्षण नवीन नाटक घेऊन आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे,'' सारखं काहीतरी होतंय...'' आणि या नाटकात काम नाही तर याच्या लेखन-दिग्दर्शनाची मुख्य जबाबदारी संकर्षणनं उचलली आहे. पहिल्यांदाच संकर्षण लेखन आणि दिग्दर्शन या दोन भूमिका एकत्र पार पाडताना दिसणार आहे. हे नवीन नाटक २५ मार्च रोजी नाट्यगृहात आपल्या भेटीस येत आहे. संकर्षणनं नाट्यरसिकांना नाट्यगृहात येऊन नाटक पाहण्याची विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com