तुझी माझी रेशीमगाठ: मालिका सोडल्याच्या चर्चांवर संकर्षणची प्रतिक्रिया

मालिकेत संकर्षण हा श्रेयसच्या मित्राची भूमिका साकारत आहे.
Shreyas Talpade, Sankarshan Karhade
Shreyas Talpade, Sankarshan KarhadeInstagram
Summary

मालिकेत संकर्षण हा श्रेयसच्या मित्राची भूमिका साकारत आहे.

संकर्षण कऱ्हाडे Sankarshan Karhade हा एक उत्तम कवी, लेखक आणि अभिनेता आहे. त्याने अनेक नाटक आणि मालिकांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तो सध्या 'तुझी माझी रेशीमगाठ' Tujhi Majhi Reshimgath या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने ही मालिका सोडल्याच्या चर्चा सगळीकडे सुरु आहेत. झी मराठीवर सुरू झालेल्या 'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. यात अभिनेता श्रेयश तळपदे आणि प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत आहेत. सोबतच संकर्षण हा श्रेयसच्या मित्राची भूमिका साकारत आहे. या दोघांची मैत्री प्रेक्षकांना फारच आवडत आहे. मालिका अगदी उत्तम सुरु असताना गेले काही दिवस संकर्षण कऱ्हाडे ही मालिका सोडत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

नाट्यगृहे पुन्हा सुरू होत असल्याने संकर्षण त्याच्या नाटकासाठी मालिकेतून एक्झिट घेत असल्याच्या चर्चा आहेत. नाटकाच्या प्रयोगामुळे तो मालिका सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. आता यावर संकर्षणने प्रतिक्रिया दिली आहे. 'तुझी माझी रेशीमगाठ'च्या फॅन पेजवर त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Shreyas Talpade, Sankarshan Karhade
आई कुठे काय करते: अरुंधतीच्या आयुष्यात होणार 'या' खास व्यक्तीची एण्ट्री

"मला न विचारता, माझ्याशी काहीही न बोलता मी ही मालिका सोडणार असल्याची अफवा काहींनी पसरवली आहे. मात्र हे साफ चुकीचं आहे. मी ही मालिका सोडणार नाही. तुमचं माझ्या कामावर आणि माझं प्रेक्षकांच्या प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. २३ तारखेपासून आमच्या नाटकाचा प्रयोग सुरु होत आहे. त्यामुळे माझी धावपळ होणार आहे. आम्हा कलाकारांना धावपळ हवी असते, सतत काम पाहिजे असतं, आम्हाला तुमचं जास्तीत जास्त प्रेम हवं असतं. त्यामुळे मी नाटकंही करणार आणि मालिकाही करणार आणि कविताही करणार", असं म्हणत संकर्षणने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com