सूर नवा ध्यास नवा: सन्मिता धापटे-शिंदे ठरली महागायिका

सहा गायिकांमध्ये सन्मिताने मारली बाजी
Sanmita Dhapte Shinde
Sanmita Dhapte Shinde twitter/colors marathi

कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची' sur nava dhyas nava या रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा रविवारी पार पाडला. या अंतिम सोहळ्यात सहा गायिकांपैकी सन्मिता धापटे-शिंदे Sanmita Dhapte Shinde हिने बाजी मारली. सन्मिताने महाराष्ट्राची महागायिका होण्याचा मान पटकावला आहे. एकापेक्षा एक दमदार गायनकौशल्य असलेल्या सहा स्पर्धकांमध्ये चुरस रंगली होती. रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने आणि श्रीनिधी देशपांडे यांच्यावर मात करत सन्मिताने ही स्पर्धा जिंकली. (Sanmita Dhapte Shinde become winner of sur nava dhyas nava aasha udyachi grand finale )

संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यातून अनेक स्पर्धकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यापैकी १६ सुरेल स्पर्धकांनी महाअंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. अहमदनगरची सन्मिता धापटे-शिंदे, डोंबिवलीची प्रज्ञा साने, बारामतीची राधा खुडे, पुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने यांनी अटीतटीच्या या स्पर्धेत आपल्या सुरांनी रसिकांची आणि कॅप्टन्सची दाद मिळवत महाअंतिम फेरीत अव्वल स्थान मिळवलं. या सहा जणींपैकी कोण विजयी ठरणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं.

Sanmita Dhapte Shinde
'मराठी मुलगा भेटला नाही का?' सोनालीनं दिलं भन्नाट उत्तर

'सूर नवा ध्यास नवा'चं हे चौथं म्हणजेच फक्त गायिकांचं पर्व खूप खास ठरलं. कोरोनाच्या कसोटीच्या काळात खूप चिकाटीने आणि धैर्याने कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने अथकपणे हा सुरांचा महायज्ञ सुरू ठेवला होता. विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून कॅप्टन्सची आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं या गायिकांनी जिंकली. रविवार पार पडलेल्या रंगतदार महाअंतिम सोहळ्यात अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांचीही अदाकारी रसिकांना अनुभवता आली. तसंच या पर्वाचा संगीत समुपदेशक, गायक,संगीतकार अजित परब, तरुणांचा लाडका गायक स्वप्निल बांदोडकर, लोककलावंत नागेश मोरवेकर यांच्या भन्नाट परफॉर्मन्सनी सोहळ्याची रंगत वाढवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com