लॉकडाऊनमध्ये घरात चटणी बनवत होती दंगल गर्ल, दुखापत झाली आणि थेट करावी लागरी सर्जरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

सान्या घरात काम करत असतानाच या घटनेला बळी पडली आहे ज्यामुळे तिच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे सान्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये जावं लागलं इतकंच नाही तर तीला बोटाची सर्जरी देखील करावी लागली. 

मुंबई- लॉकडाऊनमध्ये सामान्य लोकांसोबतंच सेलिब्रिटीही होम शेफ बनले आहेत. घरात स्वतःला आवडणारे वेगवेगळे पदार्थ ते बनवताना दिसत आहेत. काही वेळापूर्वी दंगल गर्ल अभिनेत्री सान्या मल्होत्राने सोशल मिडियावर तिचं बोटाला दुखापत झाल्याचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. तिला ही दुखापत कशी झाली हे आता समोर आलं आहे. सान्या घरात काम करत असतानाच या घटनेला बळी पडली आहे ज्यामुळे तिच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे सान्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये जावं लागलं इतकंच नाही तर तीला बोटाची सर्जरी देखील करावी लागली. 

हे ही वाचा:  अभिनेता अक्षय कुमारने मागितली पत्नी ट्विंकलची माफी, म्हणाला 'माझ्या पोटावर लाथ मारु नकोस'

अभिनेत्री सान्या मल्होत्रा लॉकडाऊनमुळे घरात एकटीच होती. ती स्वतःसाठी चटणी बनवण्याचा प्रयत्न करत होती. तिने ग्राईंडर मिक्सरवर ठेवलं आणि झाकण लावण्याआधीच चुकुन मिक्सरचं बटण फिरवलं. जेव्हा ग्राईंडरमधील सामान बाहेर उडायला लागलं तेव्हा ती झाकण लावण्याचा प्रयत्न करत होती. तिला ते झाकण लावता आलं नाही आणि यादरम्यान तिचा हात ग्राईंडरमध्ये गेला ज्यामुळे तिची करंगळी चालू असलेल्या ब्लेंडरमध्ये आली आणि त्या बोटाला गंभीर दुखापत झाली. 

Bollywood: Sanya Malhotra rushed to the hospital after injuring ...

सान्याच्या मित्र-मैत्रीणींनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सान्या जवळपास बेशुद्ध होत होती. तिच्या बोटातून खूप रक्त वाहत होतं. बेशुद्धावस्थेत तिने तिच्या मित्रांना घरी बोलावलं. एका मित्राच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आधी तिची कोरोनो टेस्ट करण्यात आली. ती निगेटीव्ह आल्यानंतरंच तिला हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये तिच्या बोटामध्ये दोन फ्रॅक्चर आणि तीन मोठ्या जखमा झाल्या आहेत. 

या घटनेनंतर सान्याने तिची जुनी रुममेट हर्षिता कालराला तिच्यासोबत राहण्यासाठी बोलवल्याचं कळतंय. गेल्या आठवड्यात सान्याने तिच्या सोशल मिडियावरुन फोटो शेअर करत लिहिलं होतं की, त्या क्रेझी ९ दिवसांनंतर बोटाची काळजी घेतल्यानंतर मी पुन्हा परत आली आहे. छोट्या बोटाची मोठी कहाणी आहे. तिच्या या कॅप्शनवरुन याविषयी जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता होती. 

sanya malhotra undergo surgery to her little finger after accident  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanya malhotra undergo surgery to her little finger after accident