संयुक्तचे शतक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सारेगामाची निर्मिती असणाऱ्या झी टीव्हीवरील संयुक्त या आगळ्यावेगळ्या मालिकेचे 100 भाग नुकतेच पूर्ण झाले. त्या निमित्ताने मालिकेच्या टीमने केक कापून मालिकेची शंभरी साजरी केली. हा आनंदाचा दिवस फक्त केक कापण्यापुरताच राहिला नाही, तर टीमने धमाल नृत्यही केले. पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे निर्माते दिग्दर्शकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अभिनेता किरण कुमार यांनी पार्टीची सुरुवात शॅम्पेन उडवून केली. या पार्टीत निर्माते सिद्धार्थ आनंद कुमार, त्यांची पत्नी अभिनेत्री रोशनी चोपडा, शुभांगी लाटकर, हर्ष वशिष्ठ, सिमरन खन्ना हे आर्वजून उपस्थित होते.

सारेगामाची निर्मिती असणाऱ्या झी टीव्हीवरील संयुक्त या आगळ्यावेगळ्या मालिकेचे 100 भाग नुकतेच पूर्ण झाले. त्या निमित्ताने मालिकेच्या टीमने केक कापून मालिकेची शंभरी साजरी केली. हा आनंदाचा दिवस फक्त केक कापण्यापुरताच राहिला नाही, तर टीमने धमाल नृत्यही केले. पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे निर्माते दिग्दर्शकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. अभिनेता किरण कुमार यांनी पार्टीची सुरुवात शॅम्पेन उडवून केली. या पार्टीत निर्माते सिद्धार्थ आनंद कुमार, त्यांची पत्नी अभिनेत्री रोशनी चोपडा, शुभांगी लाटकर, हर्ष वशिष्ठ, सिमरन खन्ना हे आर्वजून उपस्थित होते. किरण कुमार आणि शुभांगी लाटकर यांनी सांगितले, "ही तर एक सुरुवात आहे. आमची मालिका वेगळी आहे आणि ती प्रेक्षकांना आवडत आहे.' 

Web Title: sanyukta's century