Sapana Chaudhary: 'आम्ही खानदानी...' कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावरही अकड जाईना!| Sapana Chaudhary Haryanvi dancer share video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sapana Chaudhary news

Sapana Chaudhary: कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावरही अकड जाईना! 'आम्ही खानदानी...'

Social media viral video: सपना ही तिच्या वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत राहण्यासाठी ओळखली जाते. देशात सपना ही सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. तिच्या (sapana chaudhary) व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये तर तिचा प्रचंड चाहतावर्ग आहे. आता सपना ही कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. प्रेक्षकांची फसवणूक केल्याप्रकरणी (insta star video) तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी सपनानं देखील एक वेगळा व्हिडिओ शेयर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्ही गरीब, आमचे वडिल गरीब, आमच्या सात पिढ्या गरीब असं सपनानं त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

सोशल मीडियावर आता सपनाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिनं आम्ही खानदानी गरीब असल्याचे म्हटले आहे. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं तर गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील तुला कसे वागायचे कळत नाही... असे म्हटले आहे. तर दुसऱ्यानं प्रेक्षकांना गृहित धरु नये. तसे केल्यास त्यांची नाराजी महागात पडल्याशिवाय राहत नाही. असे सांगून सपनाला काळजी घेण्यास सांगितले आहे. सपनाच्या त्या व्हिडिओला आतापर्यत दहा हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. जेव्हा कुणी माझ्याकडे उधारीचे पैसे मागतात तेव्हा...असं कॅप्शन तिनं त्या व्हिडिओला दिले आहेत.

हेही वाचा: Amruta Khanwilkar: 'चंद्रा' वेगळ्या रंगात, अनोख्या ढंगात!

काही दिवसांपासून सपनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्याचे कारण तिनं प्रेक्षकांची केलेली फसवणूक. लखनऊमध्ये तिच्या डान्स शो चे आयोजन करण्यात आले होते. तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तीनशे रुपयांचे तिकिटही खरेदी केले होते. मात्र त्या शोसाठी ती काही गेलीच नाही. तिला त्या शो साठी जाण्यास बराच वेळ लागला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी गोंधळ केला. लोकांनी आयोजकांकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी ते परत केले नाही. त्यानंतर अनेकांनी पोलिसांकडे धाव घेत सपना आणि त्या कार्यक्रमाचे निर्माते यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सपना कोर्टात हजर न झाल्यानं तिच्याविरोधात वॉरंटही निघाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

हेही वाचा: Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे!' चतूरच्या मीम्सचा कहर

Web Title: Sapana Chaudhary Haryanvi Dancer Share Video Arrest Warrant Fans Comment Khandani Garib

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..