काँग्रेस प्रवेश नाकारल्यानंतर सपना चौधरी भाजप खासदाराच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 March 2019

पत्रकार परिषदेनंतर लगेचच सपना चौधरी भोजपुरी अभिनेता व भाजप खासदार मनोज तिवारी यांना भेटली आणि त्यानंतर परत एकदा चर्चांना उधाण आले आहे. 

हरियाणाची डान्सर सपना चौधरी हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. काल सपनाने पत्रकार परिषद घेऊन या चर्चेला फोल ठरविले. 'मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. मी एक कलाकार आहे. मला राजकारणात यायचे नाही.' असे तिने काल सांगितले. पत्रकार परिषदेनंतर लगेचच ती भोजपुरी अभिनेता व भाजप खासदार मनोज तिवारी यांना भेटली आणि त्यानंतर परत एकदा चर्चांना उधाण आले आहे.

sapna_manoj

रविवारी संध्याकाळी सपनाने पत्रकार परिषद बोलावली. तेव्हा तिने राजकारण क्षेत्रापासून आपण दूर असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर लगेच सपनाने मनोज तिवारी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेतच. पण या भेटीमागे नेमके कारण काय? यावर सध्या चर्चा रंगल्या आहेत. सपना भाजपमध्ये प्रवेश करण्याविषयी देखील चर्चा होत आहेत. यावर सपनाने स्पष्टीकरण दिले आहे की, 'मनोज तिवारी माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत आणि माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मी त्यांच्या संपर्कात आहे. पण मी भाजप प्रवेश करणार आहे असा याचा अर्थ अजिबात नाही.' 

संबंधित बातमी :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sapna chaudhary after rejecting news of joining congress meet bjp mp manoj tiwari