Sara Ali Khan च्या ब्रेकअपवर दोनच शब्दात आई अमृता सिंगनं दिलेली Reaction... अभिनेत्रीनं केला खुलासा Amrita Singh Reaction on Sara's breakup | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan, Amrita Singh

Sara Ali Khan च्या ब्रेकअपवर दोनच शब्दात आई अमृता सिंगनं दिलेली Reaction... अभिनेत्रीनं केला खुलासा

Sara Ali Khan सध्या 'गॅसलाइट' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमा निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत दरम्यान तिनं वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाइफविषयी अनेक खुलासे केले आहेत. साराला विचारलं गेलं होतं की तिचं ब्रेकअप झाल्यावर आई अमृता सिंगनं काय रिअॅक्शन दिली होती.

सारा अली खाननं हे देखील सांगितलं की २०२० मध्ये तिचा सिनेमा 'लव्ह आज कल' फ्लॉप झाल्यावर तिचे वडील सैफ अली खान काय म्हणाले होते.

'लव्ह आज कल' सिनेमा आधी सारा अली खान कार्तिक आर्यनला डेट करत होती अशी जोरदार चर्चा रंगली होती. आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते.(Sara Ali Khan Breakup mother amrita singh reaction)

सारा अली खान विक्रांत मैसी आणि चित्रांगदा सिंग सोबत 'गॅसलाइट' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. सिनेमा ३१ मार्चला रीलिज होत आहे.

ईटाईम्सनं सारा अली खानशी केलेल्या बातचीती दरम्यान तिला विचारलं की,'तिचं ब्रेकअप झाल्यावर आई अमृता सिंगनं कोणत्या दोन शब्दात रिअॅक्शन दिली होती?'

यावर सारानं उत्तर दिलं की,'इट्स ओके'... असं आई म्हणाली होती.

सारा आणि कार्तिकच्या डेटिंग आणि ब्रेकअपच्या बातम्यांना तेव्हा ऊत आला होता. अर्थात दोघांनी आजपर्यंत यावर बोलणं टाळलं आहे.

सारा आणि कार्तिकच्या लिंकअपच्या बातम्या करण जोहरच्या शो पासनं सुरू झाल्या. त्यानंतर करण जोहरनंचं आपल्या शोमध्ये दोघांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आणले होते. आता सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिलच्या अफेअरचं गॉसिप सध्या जिकडे-तिकडे होताना दिसत आहे.

'लव्ह आज कल' सिनेमा चालला नाही तेव्हा तुझ्या वडीलांची सैफ अली खानची रिअॅक्शन काय होती? हा प्रश्न देखील साराला विचारला गेला.

तेव्हा अभिनेत्री म्हणाली,''त्यांना माझा अभिनय आवडला नव्हता. ते खूश नव्हते फिल्म पाहून. त्यांनी म्हटलं होतं की,तू चांगला अभिनय नाही केलास''.

लव्ह आज कलच्या पहिल्या भागात सैफ अली खान आणि दीपिका पदूकोण होते. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती.