सैफची कन्या सारा खानची हृतिकसोबत एंट्री?

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

मुंबई : खूप स्टार कलाकार असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्यांना बॉलिवूडचं तिकीट सहज मिळतं हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. आता सैफ अली खानची कन्या सारा खान बॉलिवूडमध्ये 'एंट्री' करणार आहे. सारा आपल्या पहिल्यावहिल्या चित्रपटात सुपरस्टार हृतिक रोशनसोबत झळकणार आहे.

सैफ अली खान चित्रपटांमध्ये अद्याप नायकाच्या भूमिका साकारत असताना दुसरीकडे त्याची कन्या सारा खानचेही नायिका म्हणून जोशपूर्ण पदार्पण होत आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित करीत असलेला एक विनोदी चित्रपट ती करणार असल्याचं सूत्रांनी सांगितले. 

हृतिक रोशनने यापूर्वी करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘अग्निपथ’मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. नव्या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही, मात्र करण मल्होत्राच्या या विनोदपटामध्ये सारा खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षात मार्चमध्ये चित्रपटाचा मुहूर्त असेल, असे सूत्रांनी सांगितले. 
 
Web Title: sara ali khan to debut with hrithik roshan