'लव आज कल' फ्लॉप झाल्यानं पुरती खचली होती सारा.. चुकीचा विचार करत घेतला होता 'हा' निर्णय Sara Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan

Sara Ali Khan: 'लव आज कल' फ्लॉप झाल्यानं पुरती खचली होती सारा.. चुकीचा विचार करत घेतला होता 'हा' निर्णय

Sara Ali Khan: सारा अली खान सध्या बॉलीवूडमध्ये आपला जम बसवण्याच्या मागे लागली आहे. सारानं तसं पाहिलं तर आतापर्यंत अनेक सिनेमांतून काम केलं आहे. पण हवा तसा मोठा हिट सिनेमा तिच्या नावावार अद्याप नाही. ज्यामुळे तिचं नाव टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामिल होईल. अर्थात सर्वसामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटींना देखील अपयशाची भीती असतेच. आपल्या याच अपयशाविषयी वाटणाऱ्या भीतीचा खुलासा सारानं एका मुलाखतीत केला आहे.

साराचा अपेक्षा असलेला 'लव आज कल' सिनेमा बॉक्सऑफिसवर दणक्यात आपटला. या सिनेमात पहिल्यांदा सारा आपला क्रश कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. पण ना या जोडीची जादू काम करून गेली ना सिनेमाचा दुसरा भाग लोकांच्या पचनी पडला.

आणि या सिनेमावर फ्लॉपचा शिक्का बसताच साराचं देखील मन तुटलं. तिनं गोष्ट इतकी मनाला लावून घेतली की तिला आपल्या येणाऱ्या प्रत्येक सिनेमाविषयी भीती वाटायची.(Sara Ali Khan Gaslight actress afraid of failure she is going to take such step)

सारानं फ्लॉपच्या भितीनं आपल्या येणाऱ्या पुढीला काही सिनेमातून बाहेर पडण्याचं ठरवलं. तिनं दिग्दर्शकांना नकार कळवायाला सुरुवात केली होती. पण तेव्हा तिच्या सांगण्यानंतरही दिग्दर्शक आनंद एल राय यांनी तिचा नकार स्विकारला नाही.

सारा म्हणाली,तिनं त्यावेळी दिग्दर्शक आनंद एल राय यांना कॉल केला आणि 'अतरंगी रे' सिनेमात तिच्याऐवजी दुसरी अभिनेत्री घ्या असं म्हटलं. पण साराचं हे बोलणं दिग्दर्शकाला पटलं नाही. ना त्यांनी तिच्या बोलण्याला गंभीरतेनं घेतलं. त्याऐवजी त्यांनी साराला चांगलं मार्गदर्शन करत चार उपयोगाच्या गोष्टी सांगितल्या.

दिग्दर्शक आनंद एल रायने साराला म्हटलं की,''जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुम्ही फक्त उठत नाही तर उठून पळू लागता''.

त्यांनी साराला दोन ऑप्शन दिले. त्यातील पहिला होता की एकतर तू बॅकफूटवर खेळ किंवा तुझे १०० पर्सेंट या सिनेमाला दे. तसंच त्यांनी साराला दुसरं ऑप्शन साराला निवडायला सांगितलं. साराच्या म्हणण्यानुसार अपयशाचा सामना केल्यानंतर तिच्यात एक कलाकार म्हणून स्क्रिप्टची निवड करण्यात आणि आपल्या सिनेमां विषयी चांगली समज आली आहे.