Sara Ali Khan Troll: इस्लाम धर्मात हे.. महाशिवरात्रीच्या पोस्टवरून सारा ट्रोल! मुस्लिम फॅन्सकडून जोरदार टीका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan Gets Trolled For Maha Shivratri Post

Sara Ali Khan Troll : इस्लाम धर्मात हे.. महाशिवरात्रीच्या पोस्टवरून सारा ट्रोल! मुस्लिम फॅन्सकडून जोरदार टीका..

Sara ali khan Gets Trolled: नुकतीच महाशिवरात्र झाली, यानिमित्ताने सर्वांनी भगवान शंकराची आराधना केली, हा उत्सव बॉलीवुडकरांनीही मोठ्या आनंदात साजरी केला.

अनेक बडे सेलिब्रिटी शंकराच्या मंदिरात गेले होते तर काहींनी जुने फोटो शेयर करत चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. अशीच पोस्ट अभिनेत्री सारा अली खान हिने देखील केली होती. पण ही पोस्ट तिला चांगलीच महागात पडली आहे.

(Sara Ali Khan Gets Trolled For Maha Shivratri Post)

अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. साराचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

तिच्या पोस्टकडे सारेच लक्ष ठेवून असतात. पण महाशिवरात्रीची पोस्ट मात्र तिला अडचणीत आणणारी ठरली आहे. कारण साराला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या म्हणून इस्लाम धर्मीय चाहत्यांकडून ट्रोल केलं जात आहे.

साराने “जय भोलेनाथ” असं कॅप्शन देत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसत आहे.

डोक्यावर ओढणी, कपाळावर चंदनाचा टिळा अशी भक्तीत तल्लीन झालेली सारा या फोटोंमध्ये पाहायला मिळते. साराने या आधीही अनेक हिंदू धर्मीयांच्या सणाला शुभेच्छा दिल्या आहेत, अनेकदा ती मंदिरात गेली आहे पण यंदा मात्र तिची पोस्ट नेटकऱ्यांनी चांगलीच ट्रॉल केली आहे.

एका नेटकाऱ्याने म्हंटलं आहे की, 'मुस्लिम असूनही तू मंदिरात जातेस. तुला लाज वाटली पाहिजे.' तर एकाने म्हंटलं आहे की, 'मूर्ती पूजा इस्लाममध्ये हरम मानली जाते. असं असूनही तू ते करते आहेस.' आणि एका नेटकाऱ्याने तर, ''तू फक्त नावानेच मुस्लिम आहेस'' म्हणत तिला अनफॉलो केलं आहे.

पण सर्व धर्म समान मानून सारा दोन्ही धर्मांचे सण साजरा करते म्हणून अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर तिची बाजू घेऊन चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला डिवचनाऱ्यांना सडेतोड उत्तरं ही दिली आहेत.