दीपिका पाठोपाठ आता सारा अली खान देखील गोव्याहून मुंबईला रवाना, मिडियाला पाहून फिरवली पाठ

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 24 September 2020

सारा अली खान हिचं नावंही या ड्रग कनेक्शनमध्ये समोर आलं आहे. सारा अली खानला एनसीबीने समन्स पाठवले आहेत आणि चौकशीसाठी २६ सप्टेंबरला बोलवलं आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा ड्रग कनेक्शनशी संबंध आल्याने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची नावं यात आता समोर यायला लागली आहेत. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान हिचं नावंही या ड्रग कनेक्शनमध्ये समोर आलं आहे. सारा अली खानला एनसीबीने समन्स पाठवले आहेत आणि चौकशीसाठी २६ सप्टेंबरला बोलवलं आहे. सारा काही दिवस अमृता सिंह यांच्यासोबत गोव्यातील घरी होती. आता सारा गोव्याहून मुंबईला रवाना होण्यासाठी निघाली आहे. एअरपोर्टवर साराने मिडियाला पाहून तोंड फिरवल्याची चर्चा आहे.

हे ही वाचा: शर्लिन चोप्राचे ड्रग्स कनेक्शनबाबत मोठे खुलासे, बॉलीवूड आणि क्रिकेटर्सच्या पत्नींवर केले आरोप  

Sara Ali Khan to be called-in for interrogation on September 26

ड्रग कनेक्शनमध्ये सारा अली खानविरुद्ध पुरावे मिळाले असल्याचं म्हटलं जातंय ज्यामुळे एनसीबी सारा अली खानची चौकशी करु इच्छिते. २६ सप्टेंबरला साराला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. याचवेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. रियाने देखील सारा अली खानचं नाव घेतल्याचं म्हटलं जातं. सारा आणि सुशांत एकत्र स्मोक करायचे. पवना फार्म हाऊसवर दोघं एकत्र ड्रग्स देखील घेत होते आणि पार्टी करत होते . तसंच 'केदारनाथ'च्या सेटवर असतानाच सुशांत आणि सारा वीडचं सेवन करायचे असं रिया चक्रवर्तीने सांगितल्याचं कळतंय. मात्र रियाच्या वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलंय की रियाने कोणत्याच सेलिब्रिटीचं नाव घेतलेलं नाही.

Sara Ali Khan leaves for Mumbai from Goa, to appear before NCB on September  26 in drug probe - mumbai news - Hindustan Times

सारा अली खानने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत मुख्य भूमिकेत होती. याच दरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली. काहीजणांच्या म्हणण्यानुसार दोघं एकमेकाला डेट करत होते. थायलंड ट्रीपमध्ये देखील दोघं एकत्र होते आणि सुशांतने सारासाठीच खास चार्टर्ड विमान बुक केल्याची चर्चा होती.  सुशांत मृत्यु प्रकरणाशी संबंधित रिया चक्रवर्ती, जया साहा, ड्रग पेडलर्स इत्यादींनी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा खुलासा केला आहे. आता एनसीबीच्या रडारवर जवळपास ५० सेलिब्रिटी असल्याची माहिती मिळतेय.    

sara ali khan reached at goa airport leaving for mumbai  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sara ali khan reached at goa airport leaving for mumbai