लग्नानंतरही एका खास व्यक्तीसोबत राहण्याची साराची ईच्छा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

लग्नानंतर सारा अली खानला एका खास व्यक्तीसोबत राहायचे असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.  

अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये फार कमी वेळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या प्रत्येक ठिकाणी उपस्थितीसाठी ती चर्चेत असते. शिवाय सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी म्हणून तर कार्तिक आर्यनवर असलेले क्रश यामुळेही सारा प्रकाशझोतात राहतेच. पण आता ती चर्चेत आहे कारण, लग्नानंतर तिला एका खास व्यक्तीसोबत राहायचे असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटले आहे.  

पदार्पणातील 'केदारनाथ' चित्रपट जरी आपटला असला तरी साराच्या अभिनयाचे सर्वत्र कौतूक झाले. साराने ‘सिम्बा’ या चित्रपटातूनही अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. ज्यानंतर खऱ्या अर्थाने ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. सध्या एका मुलाखतीत साराने तिच्या मनातील अनेक गोष्टी दिलखुलासपणे बोलल्या आहेत. साराचं तिच्या आईसोबतचे नाते खूप खास आहे. आई-मुलीपेक्षा त्यांच्यात मैत्रीचेच नाते अनेकदा पाहायला मिळाले आहे. सारानेही अनेकवेळा मुलाखतीतून या मैत्रीविषयी आपण स्वतःला लकी समजत असल्याचे बोलले आहे. आपल्याला लग्नानंतरही आईसोबतच राहायला आवडेल, असे साराने या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. 

sara_amruta

'लग्नानंतरही मला तुझ्याचसोबत राहायचं आहे, असं जेव्हा मी आईला म्हणजेच अमृता सिंग हिला सांगते तेव्हा ती सुद्धा चांगलीच वैतागते. पण, हे वैतागणं खरंखुरं नसून त्यातही नात्यातील ओढ आणि ओलावा असतो. आईपासून अधिक वेळ दूर राहिल्यास आपल्याला भीती वाटू लागते...' असे म्हणत साराने या मुलाखतीत आपल्या भावनांना वाट मोकळी केली. 

sara_amruta


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sara ali khan wants to stay with a special person even after marriage