Sara Ali Khan: साराला कार्तिकसोबत पुन्हा करायचाय रोमान्स! आशिकी 3 या चित्रपटासाठी ती तयार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sara ali khan and kartik aaryan

Sara Ali Khan: साराला कार्तिकसोबत पुन्हा करायचाय रोमान्स! आशिकी 3 या चित्रपटासाठी ती तयार

सध्या सारा अली खान अनुराग बसूचा आगामी चित्रपट 'मेट्रो इन दिनो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडचा 'प्रिन्स' म्हणजेच कार्तिक आर्यनही अनुराग बसूसोबत 'आशिकी 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

या सगळ्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 'आशिकी 3'साठी अद्याप एकही फीमेल लीड फायनल झालेली नाही. त्याचवेळी साराने आता कार्तिक आर्यन स्टारर चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना, अभिनेत्रीने कार्तिक आर्यनच्या 'आशिकी 3' चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सारा म्हणाली, "मला अद्याप 'आशिकी 3' ऑफर करण्यात आलेली नाही, परंतु मला या चित्रपटाची ऑफर आली तर मला नक्कीच आवडेल."

आशिकी ३ चे निर्माते या चित्रपटासाठी सारासोबत चर्चा करत असल्याचा दावा नुकताच बॉलिवूड हंगामाने आपल्या एका रिपोर्टमध्ये केला होता. रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, ते तिसऱ्या लीडसाठी दुसऱ्या महिला अभिनेत्रीच्या शोधात आहेत. या वृत्तानंतर जवळपास महिनाभरानंतर साराने आता 'आशिकी 3'मध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे.

2020 मध्ये आलेल्या 'लव्ह आज कल 2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिक आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, नंतर दोघे वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या.

गेल्या वर्षी जेव्हा सारा 'कॉफी विथ करण'मध्ये दिसली तेव्हा चित्रपट निर्माता करण जोहरने सारा आणि कार्तिक आर्यनमध्ये काहीतरी असल्याची पुष्टी केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला सारा आणि कार्तिक राजस्थानच्या उदयपूरमध्ये एकत्र दिसले होते. दोघांचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सारा अली खानचा 'गॅसलाइट' कालच्या दिवशी रिलीज झाला आहे. ती सध्या आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, पंकज त्रिपाठी आणि अली फजलसोबत 'मेट्रो इन दिनो'चे शूटिंग करत आहे. करण जोहरचा 'ए वतन मेरे वतन' देखील तिच्या लिस्टमध्ये आहे.

दुसरीकडे, कार्तिक आर्यन शेवटचा मोठ्या पडद्यावर क्रिती सेननसोबत 'शेहजादा'मध्ये दिसला होता. अभिनेत्याचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आणि कियारा अडवाणीची जोडी दिसणार आहे.