'काय होतीस तू काय झालीस तू', साराचा दाढी मिशीतला फोटो व्हायरल! नेटकरीही घाबरले..Sara Ali Khan Viral photo: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sara Ali Khan Viral photo

Sara Ali Khan Viral photo: 'काय होतीस तू काय झालीस तू', साराचा दाढी मिशीतला फोटो व्हायरल! नेटकरीही घाबरले..

बॉलिवुड अभिनेत्री सारा अली खान ही आपल्या सौंदर्य आणि अभिनयामुळं लोकप्रिय आहे. त्याचबरोबत ती सोशल मिडियावरही खुप सक्रिय असते. ती तिच्या मजेशीर व्हिडिओमुळेही चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या टिमसोबत आणि कोस्टार सोबत फनी व्हिडिओ शेअर करते. अशातच तिचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यात ती स्विमिंग पूलमध्ये बसलेली दिसतेय.

खरं तर हा फोटो तिनेच शेअर केला आहे. जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. यात सारा अली खान लांब केस, दाढी आणि मिशामध्ये दिसत आहे. स्विमिंग पूलच्या बाजूला बसलेल्या साराचा हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

वास्तविक सारा अली खानचा हा फोटो मजेदार पद्धतीने एडिट केला आणि तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. फोटो शेअर करण्यासोबतच साराने दिग्दर्शक होमी अदजानियाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

साराने या स्टोरीत लिहिले आहे की , “मला सांगा फोटोग्राफर कुठे आहे. माझ्यातील स्त्रीची सुंदर बाजू नेहमी समोर आणल्याबद्दल होमी अदजानिया तुमचे आभार. पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा." सारा अली खान होमी अदजानिया दिग्दर्शित मर्डर मुबारक या चित्रपटात दिसणार आहे.

तिचा हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सर्वच नेटकरी या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काहींनी साराला अभिनेत्याचा रोल करण्याचा सल्लाही दिला आहे.

टॅग्स :viralSara Ali Khanphoto