पापा सैफमुळे झालं सारा-कार्तिकचं ब्रेकअप?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. 'लव आज कल 2' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नवोदित असून देखील सर्वत्र चर्चेत असणारी जोडी म्हणजे कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. 'लव आज कल 2' चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

भलेही त्यांनी एकमेकांवरील प्रेमाची कबूली दिली नसली तरी देखील त्यांच्यातील ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीमुळे अनेक चर्चांना उधान आले आहे. मात्र आता या सर्व चर्चांना फुलस्टॅाप बसणार असा दिसून येत आहे कारण सारा आणि कार्तिकचं ब्रेकअप झाल्याची कबुली स्वत: साराचे वडील अभिनेते सैफ अली खान यांनी दिली आहे.   

सैफ सारा आणि कार्तिकच्या नात्यावर प्रतिक्रिया देत म्हणाला की, माझ्या मते साराच सध्यातरी सर्व लक्ष हे तिच्या करीयरकडे असले पाहिजे. तसेच सारा एक व्यक्ति म्हणून खूप चांगली आहे. तिला तिच्या आयुष्यात काय करायचे आहे आणि काय नाही याची तिला समज आहे. तिला नेहमीच चांगली माणसे आवडतात. त्यामुळे जर साराला कार्तिक आवडतो याचा अर्थ तो नक्कीच एक चांगला माणूस असेल' असेही सैफ म्हणाला. दरम्यान सैफच्या या वक्तव्यानंतर सारा- कार्तिकच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या असल्या तरीदेखील यातील खरं काय हे अद्याप समोर आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sara-Karthik breakup due to Papa Saif?