सारा खानचा पत्ता कट 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

काही दिवसांपूर्वीच "दंगल'फेम सना शेखचा "ठग्ज ऑफ हिंदुस्तान'च्या स्क्रीन टेस्ट वेळचा फोटो व्हायरल झाला तेव्हाच ती त्या चित्रपटाची हिरोईन असेल, हे फायनल झालं. याआधी सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान या चित्रपटात काम करणार, अशी चर्चा रंगली होती; पण तिची डाळ काही शिजली नाही.

सारा या चित्रपटासाठी यशराज स्टुडिओमध्ये ऑडिशन द्यायला गेली होती. आदित्य चोप्राला मात्र तिची ऑडिशन आवडली नाही आणि तिच्या हातातून चित्रपट गेला. अमृता सिंगला आपल्या मुलीने करण जोहरपेक्षा आमीर खानच्याच चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करावं, असं वाटत होतं. साराने लाईमलाईटमध्ये यावं, असं अमृताला वाटतंय; पण करणच्या चित्रपटातून तिने पदार्पण केलं,

तर ती त्याने बॉलीवूडला दिलेल्या अनेक स्टार्समध्ये हरवून जाईल, अशी भीतीही तिला सतावतेय; पण सध्या तरी तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाहीए. सारा याआधी "स्टुडंट ऑफ द इयर 2' आणि हृतिक रोशनबरोबरच्या एका चित्रपटातून पदार्पण करणार होती; पण आता ते दोन्ही प्रोजेक्‍ट तिच्या हातून गेले आहेत. 
 
Web Title: sara saif ali khan patta cut