
राजेश सध्या 'एक्सक्युज मी मॅडम' या टीव्ही शोचं शूटींग करत होते. राजेश यांना कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीयेत. मात्र टेस्ट केल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
मुंबई- 'बा बहु बेबी', 'साराभाई वर्सेस साराभाई टेक २', 'खिचडी' आणि 'शरारत' सारख्या हिट टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिकांपैकी एक असलेल्या अभिनेते राजेश कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेश सध्या 'एक्सक्युज मी मॅडम' या टीव्ही शोचं शूटींग करत होते. राजेश यांना कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीयेत. मात्र टेस्ट केल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.
हे ही वाचा: रिया चक्रवर्तीला CBI ने चौकशीसाठी पाठवले समन्स, डीआरडीओ गेस्ट हाऊसकडे रवाना झाली रिया
सध्या राजेश कुमार घरीत क्वारंटाईन आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शूटींगला सुरुवात केली होती. सेटवरही ते काळजी घेत होते. राजेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये लिहिलं आहे की ते सध्या होम क्वारंटाईन आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोबतंच त्यांनी चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
अभिनेते राजेश कुमार यांनी ब-याच टीव्ही शोमध्ये काम केलं आहे मात्र त्यांना साराभाई वर्सेस साराभाई या शो मधील रोसेशच्या भूमिकेने जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की त्यांना आता वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ते आता हळूहळू पुढे जात आहेत. या कारणामुळे ते स्क्रीनवर कमी दिसून येत आहेत. त्यांनी म्हटलं होतं की अभिनयाच्या विश्वापासून थोडं लांब जात ते शेती करण्यात मन रमवत होते. ज्यामुळे अनेक लोकांना वाटलं की ते आता टीव्ही दुनियेपासून लांब गेले आहेत. मात्र राजेश कुमार यांना शेतीसोबतंच त्यांची अभिनयाची कला देखील जोपासायची आहे.
काही दिवसांपूर्वीच 'ये रिश्ता क्या केहलाता है' मालिकेतील तीन मुख्य कलाकारांसोबत इतर ७ कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे या मालिकेचं शूटींग देखील थांबवण्यात आलं आहे. तसंच टीव्ही विश्वातील श्रिनु पारिख, मोहिना कुमारी सिंह आणि पार्थ समथान सारख्या अनेक कलाकारांना याआधी शूटींग दरम्यान कोरोनाची लागण झाली होती.
sarabhai vs sarabhai fame roshesh aka rajesh kumar tested corona positive quarantined at home