साराने चोरली होती मैत्रीणीची 'ही' गोष्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

अभिनेत्री सारा अली खानने 22 वर्षांपूर्वी आपल्या बालपणीच्या मैत्रीणीची चोरलेली गोष्ट अजूनही परत केलेली नाही.

मुंबई : नवोदीत असूनही अल्पावधीत आपला मोठा चाहतावर्ग तयार केलेल्या बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊँटवर एक मजेदार पोस्ट शेअर केली  आहे. यात तिने आपल्या बालपणीच्या मैत्रीणीची चोरलेली एक गोष्ट अजूनही परत केलेली नाही, असे सांगितले आहे.

साराने आपली 'पहिली' मैत्रीण वेदिका पिंटोला बर्थडे विश करणारी एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली असून यासोबतच दोघींचे बालपणीचे व आताचे फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने लिहीले आहे की, मी 22 वर्षापूर्वी तुझे पेपी चोरले होते आणि आजही हे आठवून मला फार हसू येते. 

सारा सध्या वरुण धवनसोबतच्या कुली नंबर 1 चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सोबतच सारा कार्तिक आर्यनसोबत लव आजकल 2 या चित्रपटात देखील झळकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarah had stolen this thing from best friend