राघव परत येतोय! 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 जून 2017

कलर्स वाहिनीवरील "सरस्वती' या मालिकेतील राघव या पात्राचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र राघव (आस्ताद काळे) या मालिकेत परत येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सरस्वती आणि तिचे मोठे मालक दुबईची वारी करून आले. त्याच दरम्यान तिने तिच्या मोठ्या मालकांना गमावले. पण मालक परत येतील, असा विश्‍वास सरस्वतीला होता. तो सार्थ ठरणार आहे. मालिकांमध्ये मृत व्यक्तीची व्यक्तिरेखा परत आणणे हा फंडा काही नवीन नाही, पण राघवच्या परतण्याने या मालिकेचा चाहतावर्ग नक्कीच खूश होईल. 

Web Title: saraswati marathi serials Raghav astad kale

टॅग्स