नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सरस्वती करणार दुष्टाचा संहार !

गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये सगळेच उत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला जातात. सरस्वतीवर कोणतेही संकंट आले असो पण ती देवाची पूजा, सणासुदीची तयारी मन लावून करते. आता मालिकेमध्ये नवरात्रीचा उत्सवदेखील मोठ्या उत्सहात साजरा केला जाणार आहे.

मुंबई  : कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये सगळेच उत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला जातात. सरस्वतीवर कोणतेही संकंट आले असो पण ती देवाची पूजा, सणासुदीची तयारी मन लावून करते. आता मालिकेमध्ये नवरात्रीचा उत्सवदेखील मोठ्या उत्सहात साजरा केला जाणार आहे. सरस्वती आणि देविका दोघी मिळून घटस्थापना तर करणार आहेत पण, देविका आणि सरस्वती मिळून विद्युल आणि भुजंगच्या विरोधात उभ्या राहतील ? देविका सरस्वतीला माफ करेल का? यावेळेस देवी सरस्वतीच्या सर्व दु:खाचं कसं निवारण करेल, हे बघायला मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.
 
सरस्वती मालिकेमध्ये देविकाला आता कळाले आहे कि, सरस्वतीच राघवची बायको आहे आणि हे कळल्यापासून ती सरस्वतीवर रुसली आहे. पण, सरस्वती देविकाची समजूत काढण्यात यशस्वी ठरेल का ?  ती देविकाला पटवून देऊ शकेल का कि कश्या त्या दोघी विद्युल आणि भुजंगच्या जाळ्यामध्ये अडकल्या आहेत आणि आता हे सहन करणे अशक्य आहे. या मध्येच विद्युल देविका आणि सरस्वतीच्या विरोधात अजून एक कारस्थान रचते आणि सरस्वती आणि देविकाला कैकाली मंदिराचे जिने धुणे, १०८ दिवे बनवणे मंदिराला प्रदक्षीणा घालणे अश्या बऱ्याच गोष्टी सांगते आणि या दोघी मिळून ही परीक्षा पूर्ण देखील करतात. आता सरस्वती कशी देविकाच्या सहाय्याने विद्युल आणि भुजंगच्या प्रत्येक कारस्थानांना उलटून लावेल हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वतीचा नवरात्री विशेष भाग फक्त कलर्स मराठीवर.

Web Title: saraswati new turn colors marathi esakal news