महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 'या' अभिनेत्याची बिग बॉसमधून हकालपट्टी

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मी कॉलेजमध्ये असताना बसमध्ये चढून गर्दीत महिलांचे लैंगिक शोषण करायचो या वाक्याचा संदर्भ घेत श्रवणला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

हैद्राबाद : बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादात अडकलेला असतो. बिग बॉस तामीळ 3 या कार्यक्रमातील एका स्पर्धकाच्या एका विधानामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादात अडकलेला असते. बिग बॉस हिंदी भाषेतील असो वा मराठीतील वा कोणत्याही दाक्षिणात्य भाषेतील, तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेला असतो. बिग बॉस तामीळ 3 या कार्यक्रमातील एका स्पर्धकाच्या एका विधानामुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. 

सोमवारी प्रक्षेपित करण्यात आलेल्या बिग बॉस तमीळच्या भागामध्ये श्रवणनला बिग बॉसच्या कनफेशन रूममध्ये बोलवण्यात आले आणि त्याला घराच्या बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. बिग बॉसने त्याला सांगितले की, विकेंडच्या एपिसोडमध्ये तू महिलांबाबत जे काही विधान केलेस ते अतिशय वाईट होते. तू या विधानासाठी दुसऱ्या दिवशी माफी देखील मागितलीस. पण नॅशनल टिव्हीवर महिलांबाबत अशाप्रकारे बोलणे योग्य नाहीये. बिग बॉसची टीम अशी कोणतीही गोष्ट खपून घेणार नाही. आज तामिळनाडूच नव्हे तर देशभरातील लोक बिग बॉस तमीळ हा कार्यक्रम पाहात आहेत. तुझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच तुला घराच्या बाहेर जावे लागणार आहे.
 

बिग बॉस तमीळ 3 या कार्यक्रमात विकेंडच्या एका भागात कमल हासन स्त्रियांना सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना अनेकवेळा लैंगिक शोषणाला बळी पडावे लागते याबाबत सांगत होते. त्यावर श्रवणने कबूल केले की, मी कॉलेजमध्ये असताना बसमध्ये चढून गर्दीत महिलांचे लैंगिक शोषण करायचो या वाक्याचा संदर्भ घेत श्रवणला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Evicted #Saravanan

A post shared by N.ks Creation (@insta.lv_vido) on

बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादात अडकलेला असते. बिग बॉस हिंदी भाषेतील असो वा मराठीतील वा कोणत्याही दाक्षिणात्य भाषेतील, तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकलेला असतो. बिग बॉस तामीळ 3 या कार्यक्रमातील एका स्पर्धकाच्या एका विधानामुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saravanan, who admitted to molesting women in the past, removed from Bigg Boss Tamil