तान्हाजीपेक्षा 'या' चित्रपटाने केली पहिल्या दिवशी तिप्पट कमाई

टीम ई सकाळ
Sunday, 12 January 2020

  • बॉक्स ऑफिसवर तान्हाजी हिट असताना 'या' चित्रपटाने केली तिप्पटीहून अधिक कमाई 

पुणे : बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा 'तान्हाजी-द अनसंग वॉरिअर' जोरदार कमाई करत आहे. पहिल्या दिवशी १५ कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने तिकीटबारीवर चांगलाच जोर लावला आहे. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने तब्बल २० कोटींची कमाई करत दोन दिवसात एकूण ३५ कोटींची कमाई केली आहे. मात्र, तान्हाजीपेक्षाही तिकीटबारीवर तेलगू अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री रश्मिका मंधाना यांचा सरिलेरू निक्केवरू (Sarileru Neekevvaru) हा चित्रपट तिकीटबारीवर तुफान कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for Tanhaji
फोटो सौजन्य : Business Today

सरिलेरू निक्केवरू या चित्रपटाने महेश बाबूच्या महर्षी या जुन्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. या चित्रपटाने दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या बाहुबली या हैद्राबादधील तिकीटबारीचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. हैद्राबादमध्ये सरिलेरू निक्केवरू चित्रपटाने एकूम ३७,२७,०२९ रुपयांचे कलेक्शन केले आहे. यापूर्वी बाहुबली२ या चित्रपटाने ३६,०९,२३६ रुपयांचे कलेक्शन केले होते. सरिलेरू निक्केवरू हा चित्रपट अनिल रविपुडी यांनी दिग्दर्शित केला आहे. 

Image result for Sarileru Neekevvaru
फोटो सौजन्य : IBTimes India

तत्पूर्वी, ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी : द अनसंह वॉरियर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच १५ कोटींची कमाई केली असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक राज बन्सल यांनी दिली आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १० कोटींची कमाई करणार असल्याचे निष्कर्ष लावले जात होते. पण आता १५ कोटींची कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केलेली पाहायला मिळाली. परंतु यापेक्षाही तिकीटबारीवर मोठी जादू महेशबाबूच्या सरिलेरू निक्केवरू या चित्रपटाने केलेली पाहायला मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarileru Neekevvaru made more collection Than Tanhaji in first day