सरकार Vs जग्गा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

बॉलीवूडमध्ये दोन बिग बॅनर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्यात आता काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन यांच्या "सरकार 3' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, तो आता 7 एप्रिलला पडद्यावर येत आहे. रणबीर कपूर व कतरिना कैफ यांच्या "जग्गा जासूस'शी त्याची टक्कर असेल. बॉलीवूडमध्ये सध्या 100 कोटींच्या गल्ल्याबरोबरच चित्रपटगृहांच्या स्क्रिन्ससाठीही हाणामारी होताना दिसत आहे. 

"जग्गा जासूस' व "सरकार 3' हे दोन्हीही बिग बॅनरचे चित्रपट. दोन्ही सिनेमांत सुपरस्टार असल्याने त्याची चर्चा होणारच. आधी विद्या बालनच्या "बेगम जान' चित्रपटाबरोबरच 17 मार्चला "सरकार 3' प्रदर्शित होणार होता. साहजिकच मार्चमध्येही त्याची बिग बॅनर चित्रपटाबरोबर हाणामारी होतीच; "सरकार 3'चे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी आपल्या वाढदिवशी म्हणजे 7 एप्रिलला तो प्रदर्शित होईल, असे "ट्विटर'वरून जाहीर केले. दोन्ही चित्रपटांचे विषय वेगवेगळे असले तरीही दोन बडे चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होत असल्याने चित्रपटाचे यश विभागले जाते. बॉक्‍स ऑफिसवरील कमाईही आटते. जानेवारीत "रईस' व "काबिल' एकाच वेळी प्रदर्शित झाल्याने 100 कोटींचा पल्ला गाठण्यासाठी त्यांना तब्बल एक आठवडा लागला. "सरकार 3' राजकारणावर आधारित आहे. "जग्गा जासूस' एका डिटेक्‍टिव्ह तरुणाची कथा सांगणारा हलकाफुलका चित्रपट आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा रसिकांवर गारूड करतात की रणबीर आपल्या रोमॅंटिक अंदाजाने त्यांना घायाळ करतो ते लवकरच समजेल. 

Web Title: sarkar Vs jagga