तळजाई मंदिराबाहेर अवतरले 'सरसेनापती हंबीरराव मोहिते'

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 14 November 2020

कोरोनाचा बिमोड करण्यासाठी तळजाई मातेकडे प्रार्थना करण्यात आली आहे. मंदिरा बाहेर रांगोळी साकारण्यात आली आहे. त्या रांगोळीतून सरसेनापती हंबीरराव यांची प्रतिमा साकारली गेली आहे. त्याचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पुणे - कोरोनाने जरी पूर्ण राज्यभरात कहर केला असला तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी आता प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. दिवाळीतही कोरानापासून सावध राहत पुणेकर त्यासाठी योग्य ती काळजी घेत आहे. मात्र हे सर्व करताना त्या त्या सणांचा आनंदही मनापासून घेत असल्याचे दिसून आले आहे. 

सध्या शहरात दिवाळीच्या निमित्ताने आनंदाला उधाण आले आहे. शहरात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे वातावरणात एकप्रकारचा प्रफुल्लिपणा जाणवत आहे. देशात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत पुण्यात सर्वाधिक होते. आता त्या परिस्थितीतून सावरण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.  

'दिशा खूप चांगली मुलगी आहे. बाकी गोष्टींवर सध्या काही बोलणार नाही’

कोरोनाचा बिमोड करण्यासाठी तळजाई मातेकडे प्रार्थना करण्यात आली आहे. मंदिरा बाहेर रांगोळी साकारण्यात आली आहे. त्या रांगोळीतून सरसेनापती हंबीरराव यांची प्रतिमा साकारली गेली आहे. त्याचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला नेटक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.कोरोनासुराचा वध करण्यासाठी देवीला आवाहन करण्यात आले आहे. तळजाई माता मंदिराजवळ काढण्यात आलेली रांगोळी पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करत आहेत.

Image may contain: text that says 'CIROROAOOO कोगेनासरा चा वधध करण्यासाठी दार उवड बये उघड हंबीरराव सरसेनापती दिग्दर्शक प्रविण विठठ्ल तरडे संदीप मोहिते पाटील, सौजन्य जिकम, घरमद्र बोरा निर्माते संकल्पना: मा. श्री. आण्णासाहेब थोरात'

याविषयी अधिक माहिती देताना संदिप मोहिते म्हणाले, 12 तासात रांगोळी पूर्ण झाली. काल  सकळी 7 वाजता रांगोळी काढायला सुरवात रात्री 7 वाजता ती पूर्ण झाली. 10 लोकांनी ही रांगोळी काढण्यासाठी मदत केली.

यासाठी सुमारे 90 किलो रांगोळी लागली ती पूर्ण झाल्यावर त्यावर आतिषबाजी करण्यात आली  आहे. मयूर दुधाळ आणि त्यांचे सहकारी यांनी ही रांगोळी काढली असून हे रांगोळी  प्रदर्शन 16 तारखे पर्यत खुले राहणार आहे.

'कोणे एकेकाळी तो काय होता, आता काय झाला'

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं होतं. अद्याप काही कारणांमुळं या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.चित्रपटाची निर्मिती उर्वीता प्रोडक्शन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचे आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarsenapati Hambirrao rangoli poster viral in front of taljai devi