छोट्या प़डद्यावरची ही नवी आर्ची कोण?

गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सैराटमुळं आर्ची घराघरांत पोचली. तिचं बुलेटवरून फिरणं, रेबॅन घालून गावातल्या लोकांवर शायनिंग मारणं यातून तिचा दबंग स्वभाव दिसत होता. पुढे अनेक सिनेमांमध्ये ही स्टाईल आली. पण आता सिनेमासोबत छोट्या पडद्यावरही ही स्टाईल दिसणार आहे ती कलर्स मराठीवरच्या सरस्वती मालिकते. या मालिकेत बुलेट आणि मस्त गाॅगल घालून दुर्गेची एंट्री होणार आहे. 

मुंबई : सैराटमुळं आर्ची घराघरांत पोचली. तिचं बुलेटवरून फिरणं, रेबॅन घालून गावातल्या लोकांवर शायनिंग मारणं यातून तिचा दबंग स्वभाव दिसत होता. पुढे अनेक सिनेमांमध्ये ही स्टाईल आली. पण आता सिनेमासोबत छोट्या पडद्यावरही ही स्टाईल दिसणार आहे ती कलर्स मराठीवरच्या सरस्वती मालिकते. या मालिकेत बुलेट आणि मस्त गाॅगल घालून दुर्गेची एंट्री होणार आहे. 

सरस्वतीने देविकाला निव्वळ तिच्या मोठ्या मालकांसाठी स्वीकारले, मोठ्या मनाने तिला आपलसं केलं, भैरवकरांच्या वाड्यामध्ये जागा दिली. राघव आणि देविकाचे लग्न होण्यामागे विद्युलचाच हात होता हे सरस्वतीला कळून सद्धा तिने संयम राखला. विद्युलच्या विरोधात तिने भैरवला काहीच सांगितले नाही. याच दरम्यान भैरवकरांचा वाडा आणि संपत्ती सरस्वतीच्या नावावर आहे हे विद्युलला कळाले. संपत्ती मिळविण्यासाठी रचलेले कारस्थान सरस्वतीने जर राघवला सांगितले तर राघव आपल्याला या वाड्यामधून काढून टाकेल या भीतीने विद्युलने भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारण्याचे षड्यंत्र रचले. दुर्देवाने हे दोघेही या कारस्थानामध्ये यशस्वी ठरले. विद्युल भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारून टाकले. सरस्वती मेल्यावर राघव काय करणार ? वाडा आणि संपत्ती विद्युलला मिळणार का ? सरस्वतीच्या जाण्याने मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरु होणार हे नक्की. 
 
विद्युलने सरस्वतीचा काटा काढून टाकला पण तिला मारल्यानंतर हे कळाले कि, जोपर्यंत सरस्वतीचं प्रेत मिळत नाही तो पर्यंत वाडा दुसऱ्या कुणाच्याही नावावर होऊ शकत नाही आणि जर हे प्रेत मिळाले नाही तर त्यांना सात वर्ष थांबाव लागेल यामुळे विद्युलसमोर एक नवीन समस्या उभी राहली. दुसरीकडे सरस्वतीच्या अचानक जाण्याने राघवने सगळ्यामधून मन काढून घेतले आहे. तो अचानक शांत झाला आहे, त्याचा कामामध्ये देखील रस उरलेला नाही. राघवच्या अशा वागण्याने देविका अस्वस्थ आहे. गावाच्या जवळच असलेल्या एका मंदिरामध्ये जाऊन राघवसाठी नवस बोलण्याची इच्छा देविकाने विद्युलला सांगितली. त्यासाठी राघव आणि देविका वाड्यामधून निघाले देखील, पण तिथे देविकाच्या समोर सरस्वती सारखीच दिसणारी दुर्गा नावाची मुलगी आली, तिला पाहून सरस्वती राघवच्या आयुष्यात परतणार या भीतीने ती राघवला पुन्हा वाड्यावर घेऊन गेली.
 
दुर्गा गावामध्ये तिच्या अक्का सोबत बऱ्याच वर्षांपासून राहत असून तिचा आणि सरस्वतीचा काहीच संबंध नाही, तिने पहील्यांदाच सरस्वती नाव देवीकाच्या तोंडून ऐकले. मालिकेमध्ये दुर्गाचा लूक सरस्वतीच्या लूक पेक्षा अगदीच वेगळा आहे. वेगळ्याप्रकारची साडी, गॉगल, रांगडी भाषा, आंबाडा, असा लुक असून जो सरस्वती पेक्षा अगदीच वेगळा आहे. ही दुर्गा बाईक देखील चालवते तसेच संपूर्ण गाव या दुर्गाला घाबरत, अतिशय बिनधास्त स्वभावाची आहे. देविकाने विद्युलला या दुर्गाबद्दल सांगितल्यानंतर ती भुजंगला दुर्गाला वाड्यामध्ये घेऊन यायला सांगते. दुर्गा नक्की कोण आहे? दुर्गाच्या येण्याने वाड्यामध्ये आता नक्की काय घडणार आहे ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहे.
 
आता सरस्वती सारख्याच दिसणाऱ्या दुर्गाच्या येण्याने राघव, देविकाच्या आयुष्यात काय घडेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच वाड्यामध्ये मज्जा, मस्ती आणि ड्रामा देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

Web Title: sarswati serial colors marathi durga esakal news

टॅग्स