‘सरवन’चे पोस्टर प्रकाशित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘व्हेटिलेटर’ प्रदर्शित झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तिची निर्मिती असलेला पंजाबी चित्रपट ‘सरवन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे पोस्टर गुरुनानक जयंतीच्या दिवशी प्रियंकाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पंजाबी अभिनेता अमरिंदर गिलनेही ते ट्विटरवर शेअर केले. त्याला चाहत्यांच्या कॉम्प्लिमेंट मिळाल्या. या चित्रपटाबाबत प्रियंका म्हणाली, ‘जगभरातील चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन देण्याची आमची योजना आहे. चांगल्या कथा घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘व्हेटिलेटर’ प्रदर्शित झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तिची निर्मिती असलेला पंजाबी चित्रपट ‘सरवन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे पोस्टर गुरुनानक जयंतीच्या दिवशी प्रियंकाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पंजाबी अभिनेता अमरिंदर गिलनेही ते ट्विटरवर शेअर केले. त्याला चाहत्यांच्या कॉम्प्लिमेंट मिळाल्या. या चित्रपटाबाबत प्रियंका म्हणाली, ‘जगभरातील चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी प्रोत्साहन देण्याची आमची योजना आहे. चांगल्या कथा घेऊन प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न आहे. ‘व्हेंटिलेटर’नंतर पर्पल पेबल पिक्‍चर्स व पूजा फिल्म्सच्या सहकार्याने आम्ही ‘सरवन’ बनवला आहे. तोही सर्वांना आवडेल.’

Web Title: sarwan movie poster published