esakal | 'ससुराल सिमर का' फेम अभिनेता राजीव पॉलला कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Rajeev Paul

'ससुराल सिमर का' फेम अभिनेता राजीव पॉलला कोरोना

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं आता कलाकाराचं जगणं अवघड केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला होता. आता टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या कलाकारांना कोरोनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्या मालिकांच्या चित्रिकरणावर तर परिणाम झाला आहेच मात्र चाहत्यांनाही त्यांच्या आवडत्या कलाकारांची काळजी सतावत आहे. आता 'ससुराल सिमर का' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता राजीव पॉलला (Sasural Simar Ka' Fame Rajeev Paul ) कोरोना (Tested Positive)झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात राजीववर उपचार सुरु आहे. याबाबत अधिक माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राजीवच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली असून त्यानं चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. राजीवनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन याविषयी माहिती दिली आहे. त्याचा ताप काही कमी झालेला नाही. त्यानंतर त्यानं तातडीन रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाची दुसरी लाट सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. त्याच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी सापडले आहेत. कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूडमधल्या दिग्गज कलावंतांनी चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले आहे. याशिवाय कोरोनाच्या काळात प्रशासनाला मदत करण्यासाठीही अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. त्यांचेही चाहत्यांनी कौतूक केले आहे.

हेही वाचा: आई कुठे काय करते: अरुंधतीने संजनाच्या लगावली कानशिलात

हेही वाचा: 'टप्पू'च्या वडिलांचं निधन; 'गोगी'ची भावनिक कविता व्हायरल

राजीवनं त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे की, मला कोरोना झाला आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. अशावेळी काळजी तर घ्यावीच लागते. माझा ताप काही कमी होत नाहीये. त्यामुळे मी आता अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झालो आहे.