तरुण आहे रात्र अजुनी, राजसा भ्यालास का रे?

notes-500
notes-500

सोशल मीडियामुळे आता कोणतीही एखादी घटना घडली की, त्यावर संबंधित निर्णय, घटनेवर शेलक्या शब्दांत बोचरी टीका, टिपण्णी करणारे मेसेज, तसेच कट्टर समर्थन करणारे मेसेज आदळायला सुरू होतात. मात्र, तुम्ही समर्थक असा किंवा विरोधक अशा विषयांवर येणारे विनोद मात्र भरपूर हसवतात.
नुकत्याच झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर अशाच व्हायरल होणाऱ्या काही विडंबनपर कवितांचे काही नमुने...

ओळखलंत का सर...
ओळखलंत का सर, बँकेत आला कोणी

कपडे होते घामेजलेले, डोळ्यांमध्ये पाणी

क्षणभर बसला, नंतर हासला, बोलला वरती पाहून

मोदीशेठ TV वर आले, गेले अकल्पित बोलून


पूर्वजन्मीचे कोणते हे वैर, गेले तिजोरीत पाहून,

५००, १००० घेऊन, गेले ५०, १०० ठेवून,


गाद्या फाटल्या, डबे पालथे, होते नव्हते गेले,

प्रसाद म्हणून खिशामध्ये 10-20 रुपये ठेवले


कारभारणीला घेऊन संगे सर आता नोटा मोजतो आहे

५००, १००० बंडल लावतो आहे, रद्दीचे भाव जाणतो आहे


मोदींच्या फोटोकडे बोट करताच हासत हासत उठला

पैसे तर हवेतच सर मला, यावेळी नाही हा जुमला


मोडून पडलं काउन्टिंग मशीन आणि मोडला बायकोचा कणा

पाठीवरती हात ठेवून सर फक्त 'बदलून देतो' म्हणा!!!
---
तरुण आहे रात्र अजुनी...

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा भ्यालास का रे?

एवढ्यातच नव्या नोटांवर तू, असा भाळलास का रे?
अजुनही विझल्या न गगनी काळया, पैशांच्या तारका;
 अजुन मी भ्याले कुठे रे? 
हाय! तू का मग इतका भ्यालास रे?

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू?

उमलते बँक खाते माझे.. आणि तू पुरता कंगाल का रे?

बघ तुला पुसतोच आहे २००० च्या नोटेचा वारा..

५०० च्या नोटांची बंडले तू आता जपतोस का रे?

उसळतो हुदक्यांत माझ्या आय-कराचा धुंद सोटा..
 
तू अखेर दाऊद सारखा अन भिकारडा उरलास का रे?
तरुण आहे रात्र अजूनी
--- 
नोटाबंदी

जळी स्थळी काष्ठी पाषाणी "जुने बंडलं" दिसायलेत

मेलो मेलो करीत लोकं दचकू दचकू उठायलेत,

सोनं नको नाणं नको, नको बँकेत लॉकर,
झाडझुड करू म्हणतेत कशाला नौकर चाकर?


कुरियर वाला आला तरी 'आयकर'वालाच वाटायलाय, 
कडाक्याच्या थंडीमध्ये दरदरून घाम सुटायलाय,
भाई और बहनो म्हणलं की घरातच लोकं टरकायलेत
शनी महात्म्य "हातात धरून मारुती स्तोत्र म्हणायलेत,


Cash Less खिसे झाल्यामुळं माणसं बसतेत घरी,
आता म्हणतेत NonVeg पेक्षा पिठलं भाकरीच बरी, 


स्वतःला Talented समजणारे रात्रीतून झाले बुश, 

बाकी काही असो वा नसो कॉमन मॅन खुश,


कागदाचेच तुकडे "ते" हवेत गेले उडून,

कधी न बोलणारेसुद्धा रडले गळ्यात पडून 

शक्य आहे, आता साऱ्या भानगडी बंद होतील

हळूहळू देशातून काळे पैसे जातील,

इथून पुढे कुणीच आता टेंशनमध्ये नसणार,

मोकळ्या चाकळ्या गप्पा मारून खळखळून हासणार,

बी.पी. आणि शुगरचे पेशंट होतील कमी,

गावाकडे जात राहतील मन्या आणि सुमी, 


तकतक कमी करून माणसं ओट्यावर निवांत बसतील, 

ताणतणाव गेल्यामुळं पहिल्यासारखं हासतील, 


नेमकं काय होईल ते थोड्याच दिवसात कळेल,

भरपूर सुख मिळेल का तोंडचं पाणी पळेल?
विसरू म्हणता विसरणार नाहीत नोव्हेंबर 2016, 

राष्ट्राला उद्देशून भाषण म्हणलं की पोटात यायलाय गोळा,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com