सतीश कौशिक यांनी टोचले कान

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

चित्रपट, मालिकांमधील कलाकारांना मिळणारी प्रसिद्धी अनेकांना या क्षेत्राकडे आकर्षित करत आहे. परंतु, त्यामधील बहुसंख्य कलाकारांकडे विशेष प्रशिक्षण नसते. त्यांचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांनी कान टोचले आहे. अभिनय क्षेत्रात यायचे असेल, तर प्रत्येकाने आपल्या टॅलेंटला पॉलिश केले पाहिजे, असे कौशिक यांना वाटते. ते म्हणतात, "प्रत्येकाला आपले टॅलेंट हे चांगल्या पद्धतीने सादर करता आले पाहिजे.

कारण- काळ बदलला आहे. नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अनुपम खेर, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे, ते काही विनाकारण नाही. 
सध्या बॉलीवूड आणि दूरचित्रवाहिन्यांवरील स्पर्धा खूपच वाढली आहे. त्यामुळे अनेक कलाकार एखादा चित्रपट किंवा मालिका करून गायब होतात आणि ते पुढे काही दिसत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर कौशिक यांचा सल्ला मोलाचा आहे. 

Web Title: satish kaushik acting talent