Satish Kaushik Birthday: मी तुला तुझ्या मुलासह स्वीकारेन म्हणत 'या' गरोदर अभिनेत्रीला सतीश यांनी घातली होती मागणी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik Birthday special news  actress neena gupta pregnant from vivian richards without marriage satish kaushik offered to marry

Satish Kaushik Birthday: मी तुला तुझ्या मुलासह स्वीकारेन म्हणत 'या' गरोदर अभिनेत्रीला सतीश यांनी घातली होती मागणी..

Satish Kaushik birthday: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतिश कौशिक यांचा आज वाढदिवस. गेल्याच महिन्यात ९ मार्च रोजी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अवघ्या ६६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज ते आपल्यात नाहीत. पण त्यांच्या कैक आठवणी सोबत आहेत.

सतीश कौशिक आणि अभिनयासोबत दिग्दर्शन आणि निर्मितीही केली. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटात अभिनय तर 20 हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले. बॉलीवुडमध्ये त्यांची दोस्ती यारी मोठी आहे. त्यांच्या आनंदी आणि गोड स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे.

ते आपल्या मित्रांसाठी काहीही करू शकतात, असे म्हंटले जायचे आणि ते अगदी खरं आहे. एकदा तर त्यांनी आपल्या लग्नाआधीच गरोदर राहिलेल्या मैत्रिणीला नैराश्या बाहेर काढण्यासाठी चक्क लग्नाची मागणी घातली होती.

(Satish Kaushik Birthday special news actress neena gupta pregnant from vivian richards without marriage satish kaushik offered to marry)

ती मैत्रीण आहे अभिनेत्री नीना गुप्ता आहेत. झाले असे की, नीना गुप्ता आणि सतीश कौशिक हे चांगले मित्र होते. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र कामही केलंय. पण त्यावेळी नीना गुप्ता या वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह-इनमध्ये राहत होत्या. दोघांनी लग्न केले नाही पण नीना गरोदर राहिल्या. त्यानंतर नीना यांनी ठरवलं की त्या बाळाला जन्म द्यायचा. पण निर्णय एवढा सोपा नव्हता. या निर्णयामुळे त्या बराचकाळ तणावात राहिल्या.


त्यावेळी सतीश कौशिक यांनी आपल्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घातली. तुझ्या बाळासहीत तुला स्वीकारेन असं त्यांनी नीना यांना सांगितलं.

या विषयी सतीश एका मुलाखतीत म्हणाले होते, ' होय, मी बोललो होतो तिला लग्नाबाबत. अगदी काळजी करू नकोस, जर बाळाचा रंग जर सावळा असेल तर सांग की ते बाळ माझं आहे आणि आपण लग्न करू. कुणाला शंका येणार नाही.' असंही म्हणालो होतो.

“पण एक मित्र म्हणून मी फक्त माझं प्रेम व्यक्त केलं होतं. मी तिच्यासाठी चिंतेत होतो. मला तिला एकटं पडू द्यायचं नव्हतं. पण तिने तिच्या पुस्तकात म्हंटलंय की मी तिला प्रपोज केलं. मात्र ती मिक्स फिलिंग होती. ती मस्करी होती, काळजी होती तिचा सन्मान होता. मी माझ्या बेस्ट फ्रेण्डला तिला माझी गरज असताना सपोर्ट केला इतकच.” असे ते म्हणाले होते.

टॅग्स :satish kaushik