
Satish Kaushik Birthday: दिग्दर्शकाला फोटो ऐवजी एक्सरे देणाऱ्या सतीश कौशिक यांचा हा भन्नाट किस्सा बघाच..
satish kaushik birthday: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सतिश कौशिक यांचं गेल्याच महिन्यात ९ मार्च रोजी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अवघ्या ६६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज ते आपल्यात नाहीत. पण त्यांच्या कैक आठवणी सोबत आहेत. विशेष म्हणजे आज सतीश यांचा वाढदिवस..
मिस्टर इंडिया या चित्रपटातल्या कॅलेंडर या भूमिकेमुळे त्यांना बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. पुढे त्यांनी अनेक सिनेमे केले. विनोद आणि सतीश यांचं एक भन्नाट नातं जमलं होतं. त्यामुळे सतीश यांनी साकारलेली पात्रं ही बरीच गाजली.
Satish Kaushik Birthday special news director ask him photos for casting and satish said i have my x ray
आज सतीश यांच्या आयुष्यातला एक भन्नाट किस्सा जाणून घेणार आहोत. ''सतिश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९६५ रोजी हरियाणार इथं झाला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्यांनी अनेक नाटकांत काम केलं. १९८७ मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटामध्ये कॅलेंडर या भूमिकेतून त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये दीवाना मस्ताना या चित्रपटात पप्पू पेजर ही भूमिका निभावली.
१९९० मधील राम लखन आणि १९९७ मधील साजन चले ससुराल या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो मध्ये बोलताना सतिश कौशिक यांनी हा किस्सा सांगितला होता. कौशिक यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांना आपल्या लुक्सबद्दल सतत काळजी वाटत असायची. त्यावेळी त्यांना ''मंडी'' या चित्रपटासाठी कास्ट केलं होतं.
पण सतीश यांच्यासाठी ही भूमिका मिळवणं इतकं सोप्पं नव्हतं.. त्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणेच त्यांनी एक युक्ती केली. सतीश म्हणाले, मी एकदा एक्स रे काढून घरी येत होतो. मला किडनी स्टोन झाला होता. अशातच श्याम बेनेगल यांचा फोन आला आणि त्यांनी कास्टिंग साठी फोटो मागवला.''
पुढे ते म्हणाले, "माझ्याकडे माझा फोटो नव्हता आणि मला हे माहित होतं की फोटो बघून माझी कास्टिंग होणार नाही. त्यामुळे मी थोडं डोकं चालवलं. मी त्यांना म्हणालो की माझ्याकडे माझे फोटो नाहीत, पण एक्स रे रिपोर्ट आहे. मी आतून खूप चांगला माणूस आहे. श्यामजींना हे ऐकल्यावर खूप हसू आलं आणि मला 'मंडी' चित्रपटामध्ये काम मिळालं.