Satish Kaushik: सतीश कौशिक यांचा मृत्यू की घातपात? दिल्ली पोलिसांना सापडली औषधे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satish kaushik death suspicious Delhi Police recovers medicines from farmhouse

Satish Kaushik: सतीश कौशिक यांचा मृत्यू की घातपात? दिल्ली पोलिसांना सापडली औषधे

Satish Kaushik death is suspicious : बॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा मृत्यु हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणार दिल्ली पोलिसांनी पुन्हा एक मोठी अपडेट दिली आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी काही महत्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागले आहेत.

(satish kaushik death suspicious Delhi Police recovers medicines from farmhouse)

सतीश कौशिक यांचे गुरुवारी 9 मार्च रोजी निधन झाले. ते अवघ्या 66 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या अभिनयाने आणि स्वच्छंदी स्वभावाने त्यांचा मित्र आणि चाहता परिवार मोठा होता. गुरुवारी रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. पण आता ;पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूचे नवे गूढ समोर आले आहे.

कौशिक यांच्या मृत्युनंतर त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. कौशिक हे त्यांच्या फार्म हाऊसवर गेल्यानंतर त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना केव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी नेमकं काय घडलं, या गोष्टींचा पोलिसांकडून तपास सुरू होता.

सतीश हे त्यांच्या मृत्युपूर्वी होळीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण या दरम्यान नेमकं काय घडलं याचा तपास दिल्ली पोलिस करत होते.

गुरुवारी सतीश यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे नमूद करण्यात आले होते. पण आता हा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. सतीश ज्या फार्महाऊसवर होते तिथे काही औषधं दिल्ली पोलिसांना आढळून आली आहेत. पुढील तपास अद्याप सुरू असून आता या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

टॅग्स :Bollywood News