Satish Kaushik मृत्यू प्रकरणात 'वॉन्टेड' उद्योगपतीची एन्ट्री! तपासाला वेगळ वळण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik Death Hansal Mehta Bollywood Director

Satish Kaushik मृत्यू प्रकरणात 'वॉन्टेड' उद्योगपतीची एन्ट्री! तपासाला वेगळ वळण...

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांनी ९ मार्च रोजी या जगाचा निरोप घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनाने बॉलीवूड कलाकारांना आणि त्यांच्या देशभरातील चाहते यांनाही धक्काच बसला. सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाबाबतही पोलीस तपासात गुंतले आहेत. त्याचवेळी सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाचा नवा मुद्दा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश ज्या पार्टीत उपस्थित होते त्या पार्टीत एक वाँटेड व्यापारीही उपस्थित होता. पोलिसांनी पाहुण्यांच्या यादीचीही तपासणी केली, ज्यामध्ये एका उद्योगपतीचे नाव समोर आले आहे, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

दिल्ली पोलिसांच्या तपासासंबंधीची माहिती त्यांच्याशी संबंधित सूत्रांनी शनिवारी दिली. पोलिस सतीश कौशिक यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणाचा तपास करत असून शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असल्याचे सांगितले गेले आहे.

दिल्ली पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. होळीच्या दिवशी सतिश कौशिक दिल्लीत होते. ते एका फार्महाऊसवर पार्टीत सहभागी झाले होते. दिल्ली पोलिसांनी तेथून काही औषधे जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पार्टी एका मोठ्या उद्योगपतीने आयोजित केली होती, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर तो इतरही काही प्रकरणांमध्ये 'वॉन्टेड' आहे.

सतीश कौशिक यांच्या निधनानंतर माध्यमांनी त्यांच्या व्यवस्थापकाशी संवाद साधला. त्यावेळी त्याने सांगितले की, पार्टीनंतर सतीश रात्री साडेनऊच्या सुमारास झोपी गेले. रात्री उशिरा 12:10 वाजता त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना गुरुग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

गुरुवारी सतीश यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे नमूद करण्यात आले होते. पण आता हा मृत्यू संशयास्पद असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

टॅग्स :viraldeathsatish kaushik