Satish Kaushik Death: कोण आहे विकास मालू ? सतिश कौशिकच्या हत्येचा आरोप असलेला उद्योगपती.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik Death

Satish Kaushik Death: कोण आहे विकास मालू ? सतिश कौशिकच्या हत्येचा आरोप असलेला उद्योगपती..

सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सतीश कौशिक ज्या फार्महाऊसमध्ये राहत होते, त्या फार्महाऊसचा मालक विकास मालू यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याच्यावर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.

गुरुग्रामच्या फार्महाऊसचे मालक आणि कुबेर ग्रुपचे मालक विकास मालू यांची पत्नी सानवी सालू हिने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहून सतीश कौशिक यांच्या मृत्यूमध्ये पतीचा हात असल्याचे म्हटले आहे. 15 कोटी रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर आता विकास मालू आहे तरी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विकास मालू हा सतीश कौशिक यांचा जवळचा मित्र होता. तो दिल्ली येथील व्यापारी आहे आणि कुबेर ग्रुपचा संचालक आहे. विकासवर आरोप करणारी सान्वी मालू ही त्याची दुसरी पत्नी आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी विकास मालूच्या पत्नीने केलेल्या आरोपांची चौकशी केली जाईल.

दक्षिण पश्चिम जिल्ह्याच्या निरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे, पोलीस महिलेला तिचे म्हणणे नोंदवण्यासाठीही बोलवणार आहेत.

विकास मालू आणि त्यांच्या पत्नीमध्ये काहीही चांगले नाही. सान्वीने दोन महिन्यांपूर्वीच पतीवर बलात्काराचा आरोप केला होता आणि गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे, वैयक्तिक वैमनस्यातून या प्रकरणात त्याला बळजबरीने ओढले जात असल्याची शक्यता काही असल्याचे सांगण्यात येत आहे.

सतीश आणि विकास खूप चांगले मित्र आहेत. दोघांची अनेक वर्षांची मैत्री आहे. मैत्री टिकवण्यासाठी तो खास मुंबईहून गुरुग्रामला आला होता. आता पुढिल तपास पोलिस करत असून लवकरच या प्रकरणातील सतत्या समोर येईल.