15 कोटींसाठी मित्रांनेच केली Satish Kaushikची हत्या? पत्नीच्या आरोपानंतर विकास मालूचं स्पष्टीकरण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik

15 कोटींसाठी मित्रांनेच केली Satish Kaushikची हत्या? पत्नीच्या आरोपानंतर विकास मालूचं स्पष्टीकरण..

Satish Kaushik Death: बॉलिवूड अभिनेता सतीश कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. सुरवातीला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं मात्र आता या प्रकरणाला नवीन वळण आलं आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर, सतीश दिल्लीत ज्या फॉर्म हाऊसमध्ये राहत होता तेथे काही आक्षेपार्ह औषधे सापडल्याने खळबळ उडाली.

त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनतर हे काही प्रमाणात शांत झाले होते त्यातच आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

सतीश कौशिक यांचा ज्या फार्म हाऊसमध्ये मृत्यू झाला त्याचा मालक विकास मालू याच्यावर आता आरोप करण्यात येत आहेत. हे आरोप खुद्द त्याच्या पत्नीनेच केले आहेत. विकास मालूची पत्नी सानवी मालू हिने सतीश कौशिकच्या मृत्यूसाठी त्याला जबाबदार धरले आहे15 कोटी रुपयांवरून दोघांमध्ये वाद झाल्याचे तिनं सांगितले आहे. आता याप्रकरणी दिल्ली पोलिसांचे वक्तव्य समोर आले आहे. आता विकासनेही मौन तोडून प्रतिक्रिया दिली आहे.

विकास मालूने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सतीश कौशिक आणि त्याचे इतर मित्र होळीच्या पार्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावेळी सतीश हे देखील जोरदार नाचताना दिसत आहे. यासोबतच विकासने आपलं मत मांडले असून सतीश कौशिक हे त्यांचे खूप जुने मित्र होते आणि त्यांच्या निधनाने त्यांची खूप आठवण येत असल्याचे सांगितले.

विकासने लिहिले, सतीश जी गेल्या 30 वर्षांपासून माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि त्यांच्यासोबत माझे नाव बदनाम करण्यासाठी या जगाला एक मिनिटही लागला नाही. या उत्सवानंतर झालेल्या दुर्घटनेचे गांभीर्य समजणे फार कठीण आहे. माझे मौन तोडून मला एवढेच सांगायचं आहे की कोणत्याही आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही.

माझ्या या आयडीद्वारे मी मीडियाशी संबंधित सर्व लोकांना विनंती करतो की त्यांनी प्रत्येकाच्या भावनांचा आदर करावा. सतीश कौशिक यांना मी आपल्या भविष्यातील प्रत्येक आगामी उत्सवात मिस होतील.

टॅग्स :deathsatish kaushik