Satish Kaushik यांची हत्या झाली म्हणणारी महिला अडचणीत.. कोर्टानं तिचाच डाव तिच्यावरच उलटवला.. 15 जूनला होणार निर्णयSatish Kaushik Case Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik Case Update

Satish Kaushik यांची हत्या झाली म्हणणारी महिला अडचणीत.. कोर्टानं तिचाच डाव तिच्यावरच उलटवला.. 15 जूनला होणार निर्णय

Satish Kaushik Case Update: दिवंगत दिग्दर्शक सतिश कौशिक यांचे निधन होऊन आता दोन महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला आहे. ९ मार्च रोजी सतिश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

अभिनेत्याच्या निधनानंतर एका दिल्लीतील महिलेनं मीडियाशी संवाद साधताना दावा केला होता की पैशाच्या वादावरनं सतिश कौशिक यांच्या पत्नीनं त्यांना मारलं. ज्यानंतर सतिश कौशिक यांच्या पत्नीनं त्या महिलेविरोधात मानहानीची केस दाखल केली होती. (Satish Kaushik Mumbai court took action and sent summons against delhi woman)

आता या प्रकरणात सतिश कौशिक यांची पत्नी शशी हिच्या तक्रारीवर अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टानं त्या महिलेला समन्स जारी केलं आहे. कोर्टाचं म्हणणं आहे की सतिश कौशिक यांच्या हत्येचा कथित दावा, प्राथमिक तपासात मानहानीचा अपराध वाटत आहे.

आपल्या तक्रारीत शशी कौशिक यांनी दावा केला आहे की दिल्लीत राहणारी सानवी हिला सिद्ध करायचं आहे की सतिश कौशिक यांचे डॉन दाऊद आणि त्याच्या मुलासोबत संबंध होते,जी रचलेली कहाणी आहे.

आता या प्रकरणात कोर्ट पुढील सुनावणी १५ जूनला करणार आहे. दिल्ली येथे राहणारी महिला सानवी मालू सोबतच राजेंद्र छाबरा या व्यक्तिला देखील या प्रकरणात समन्स जारी केलं गेलं आहे.

माहितीसाठी सांगतो की कौशिक यांची पत्नी शशीनं गेल्या महिन्यात दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलं होतं की मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की सतिश कौशिक यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे आणि यात कोणत्याही कटाचा समावेश नाही.

सतिश कौशिक यांच्या पत्नीनं तक्रार करताना असं देखील म्हटलं आहे की महिलेनं केलेले दावे खूप अपमानास्पद आहेत आणि कौशिक यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी सगळं केलं आहे.

सतिश कौशिक हे एक यशस्वी दिग्दर्शक,पटकथाकार,लेखक आणि अभिनेता होते. अर्थात महिलेनं केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य आढळलेलं नाही. पण आता या प्रकरणात कोर्ट काय निर्णय देतं याचं उत्तर १५ जूनला मिळेल.