'माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा तमाशा करु नका',Satish Kaushik यांच्या पत्नीचा संताप अनावर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Kaushik

'माझ्या नवऱ्याच्या मृत्यूचा तमाशा करु नका',Satish Kaushik यांच्या पत्नीचा संताप अनावर..

बॉलीवुड मधील एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे गुरुवारी 9 मार्च रोजी निधन झाले. ते अवघ्या 66 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली. मात्र त्याच्या गेल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थीत झाले आहेत.

त्याची हत्या करण्यात आली असल्याचा दावाही करण्यात येत आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी उद्योगपती विकास मालूची पत्नी सानवी हिने धक्कादायक दावा केला अन् संपूर्ण प्रकरणाला वेगळचं वळण आलं आहे.

या महिलेने तिच्याच पतीवर अभिनेत्याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर तिनं दिल्ली पोलीस आयुक्तांना पत्र लिहून एक एक दावे केले आहेत. 15 कोटी रुपये परत करावे लागू नयेत म्हणून विकासने सतीशची हत्या केल्याचं म्हटलं आहे. आता याप्रकरणी अभिनेत्याची पत्नी शशी कौशिक यांचं वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी सान्वीला केस मागे घेण्यास सांगितले आहे.

आता या सर्व दाव्यांवर सतीश कौशिक यांची पत्नी शशी यांच्या पत्नीची प्रतिक्रिया आली आहे. त्या म्हणाल्या की, त्यांचे पती होळीच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले होते. पैशांच्या व्यवहाराचे आरोप निराधार आहेत.

त्यांनी 'एबीपी न्यूज'ला सांगितले की, सतीश कौशिक आणि विकास मालू चांगले मित्र होते. त्याच्यात कधीही वाद नव्हते. विकास स्वतः खूप श्रीमंत आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला सतीशच्या पैशाची गरज भासणार नाही.

शशी कौशिक म्हणाले की, शवविच्छेदन अहवालात याची पुष्टी करण्यात आली आहे की दिवंगत अभिनेत्याला 98% ब्लॉकेज होते आणि त्याच्या नमुन्यात कोणतेही औषध नव्हते.

सान्वीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शशी म्हणाली की , "पोलिसांनी सर्व गोष्टींचा तपास केला आहे, मला समजत नाही की ती असं का म्हणतेय की, सतिश यांना ड्रग्स देण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. कदाचित तिला तिच्या पतीकडून पैसे हवे आहेत आणि ती आता सतीश जींना देखील या सर्व प्रकरणात सामील करत आहे.

शशी कौशिक पुढे म्हणाले- मी सान्वीला विनंती करते की कृपया असं गेम खेळू नको. मला या प्रकरणी कोणतीही शंका नाही, त्यामुळे याबाबत अधिक तपास करू नये. माझ्या नवऱ्याने एवढं मोठं काम केलं असतं तर मला सांगितलं असतं. त्यांच्या मृत्यूनंतर अशा गोष्टी घडत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे असे मला वाटतं.