
SatyaPrem Ki Katha Trailer: प्रेम, राडा अन् उतावळा नवरा.. कार्तिक - कियाराच्या चा रोमँटिक ट्रेलर एकदा बघाच
SatyaPrem Ki Katha Trailer Out Now News: मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसच्या सत्यप्रेम की कथा सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती.
अखेर या सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या ट्रेलरमध्ये कियारा आणि कार्तिक यांची रोमँटिक केमिस्ट्री बहरून निघतोय.
(satyaprem ki katha trailer out now starring kiara advani and kartik aryan)
ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की कार्तिक एक उतावळा नवरा आहे. जो लग्नासाठी उत्सुक आहे. अशातच कार्तिकची भेट कियाराशी होते. कियाराचा आधीपासून एक बॉयफ्रेंड आहे.
तरीही कार्तिकला तिच्यावर प्रेम होतं. पुढे कियारा सुद्धा कार्तिकसोबत लग्नासाठी तयार होते. पण पुढे काहीतरी घडतं आणि दोघांमध्ये दुरावा आलेला दिसतो. आता हे नेमकं काय आहे? नक्की काय घडतं? हे मात्र प्रेक्षकांना सिनेमा बघूनच कळेल.
सत्यप्रेम की कथा सिनेमाचं शूटिंगकाहीच दिवसांपूर्वी संपलं. आता या सिनेमाविषयी एक मोठी बातमी कळली आहे ती म्हणजे, ज्या गाण्याच्या शूटिंगनं सिनेमाचं शूट संपलं त्या गाण्यावर निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.
तो खर्चाचा आकडा ऐकाल तर तुम्हाला झटका लागेल यात शंकाच नाही. रिपोर्टमध्ये सांगितलं गेलं आहे की, निर्मात्यांनी फक्त एका गाण्यावर ७ करोड खर्च केले आहेत.
हे गाणं एक इंट्रोडक्टरी गाणं असणार आहे,जे एका वेडिंग थीमवर आधारित आहे. बोललं जात आहे की गाण्यात गुजराती,साऊथ इंडियन,मुस्लिम आणि ईसाई पद्धतीनं लग्न दाखवलं जाणार आहे. या गाण्याच्या शूटिंगसाठी चार वेगवेगळे वेडिंग सेट उभारण्यात आले होते.
याशिवाय.. कार्तिक आर्यनच्या सांगण्यावरनं निर्मात्यांनी एका गाण्यावर इतका पैसा खर्च केला आहे.
या गाण्यासाठी जेवढे पैसे निर्मात्यांनी खर्च केलेत तितकं कियारा अडवाणीला सिनेमासाठी मानधन मिळालं आहे.
किंबहुना त्याहून कमी मानधन तिला मिळालंय असं देखील समोर आलं आहे. एकूणच भूल - भुलैया नंतर कार्तिक - कियाराचा हा SatyaPrem Ki Katha सिनेमा सुपरहिट होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.