सावनीच्या 'अनप्लग्ड' शोचा पुण्यातून शुभारंभ!

टीम ई सकाळ
बुधवार, 14 जून 2017

प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांच्या पहिल्या सोलो मैफिलीची सुरुवात पुण्यापासून होत आहे .संगीतसंयोजनातील वेगळेपण प्रेक्षकांना या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे. या शो मध्ये नवीन व जुनी गाणी वेगळ्या पद्धतीने व नवीन ढंगात सादर केली जातील, सावनी अनप्लग्ड ची सुरुवात २ वर्ष आधी वेब सिरीजच्या रूपात झाली होती आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर या कार्यक्रमाची बांधणी करणात आली.

मुंबई : प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र यांच्या पहिल्या सोलो मैफिलीची सुरुवात पुण्यापासून होत आहे .संगीतसंयोजनातील वेगळेपण प्रेक्षकांना या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे. या शो मध्ये नवीन व जुनी गाणी वेगळ्या पद्धतीने व नवीन ढंगात सादर केली जातील, सावनी अनप्लग्ड ची सुरुवात २ वर्ष आधी वेब सिरीजच्या रूपात झाली होती आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर या कार्यक्रमाची बांधणी करणात आली.
 
या कार्यक्रमाची संकल्पना सावनी रवींद्र हिची असून या शोमध्ये हिंदी, मराठी, तामिळ, गझल, लोकगीते, सूफींगायन आदी प्रकार सादर करण्यात येणार आहेत, या मैफलीत कीबोर्डवर अनय गाडगीळ, तबला व झेमबे वर नितीन शिंदे, ड्रम्स वर अभिजित भदे, गिटार वर अमित गाडगीळ व संवादक RJ राहुल अशी तगडी संगत सावनीला मिळणार आहे.
 
पारंपरिक संगीताची साखळी मोडून तिची गाणी वेगळ्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.
 

Web Title: sawani ravindra new show esakal news

टॅग्स